World Snake Day : काय आहे जागतिक सर्प दिन? हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे तरी काय?

287
World Snake Day : काय आहे जागतिक सर्प दिन? हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे तरी काय?

वाचकहो, पृथ्वीवर सापांच्या ३,००० हून अधिक प्रजाती आहेत आणि ते अंटार्क्टिका, आइसलँड, आयर्लंड, ग्रीनलँड आणि न्यूझीलंड वगळता सर्वत्र आढळतात. या सर्व प्रजातींपैकी, सुमारे ६०० प्रजाती विषारी सापांच्या आहेत आणि केवळ २०० प्रजाती शंभर टक्के विषारी आहेत आणि मानवांना मारण्यास किंवा गंभीरपणे जखमी करण्यास सक्षम आहेत. ब्राझीलमध्ये जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा सापांच्या प्रजाती जास्त आढळतात. या देशात ३७५ हून अधिक प्रजाती राहतात. (World Snake Day)

WHO च्या अहवालानुसार भारतात २००० ते २०१९ दरम्यान अंदाजे १.२ दशलक्ष मृत्यू हे सर्पदंशामुळे मृत्यू झाले आहेत. भारतामध्ये दरवर्षी सरासरी ५८,००० मृत्यू होतात. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थच्या अध्ययनानुसार, साप आणि सर्पदंशांविषयी गैरसमज, अपुरी जागरूकता आणि ज्ञान हे भारतातील सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. (World Snake Day)

(हेही वाचा – Hoarding Accident : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोटिसचे पालन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना)

साप माणसाचा शत्रू नसून मित्र

सापाला पाय नसतात. ते एक्टोथर्मिक म्हणजेच थंड रक्ताचे असतात. याचा अर्थ ते स्थानानुसार त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात. विशेष बाब म्हणजे जगात साप चावण्याच्या सर्वाधिक घटना अमेरिकेत घडतात. मात्र अमेरिकेत चांगले उपचार उपलब्ध असल्यामुळे फार कमी लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात दरवर्षी ५० लाख साप चावण्याच्या घटना घडतात. यामध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. (World Snake Day)

वाचकहो, जागतिक सर्प दिन साजरा करण्याची सुरुवात १९७० मध्ये झाली. असे मानले जाते की १९६७ मध्ये टेक्सासमध्ये सापांसाठी एक संस्था सुरू झाली, जी १९७० पर्यंत खूप लोकप्रिय झाली. सापांच्या बाबतीत जागरुकता निर्माण करण्यासाठी या संस्थेने पुष्कळ कष्ट घेतले. १६ जुलै रोजी या संस्थेद्वारे मोठा कार्यक्रम आयोजित केला. पुढे इतर संस्थाही पुढाकार घेऊ लागल्या. या कार्यक्रमांद्वारे आणि या दिनाच्या निमित्ताने सापांच्या बाबतीत असलेले अज्ञान दूर केले जाते. साप माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. मात्र अज्ञान, गैरसमज दूर झाले तर सापांना हाताळण्यास सोपे जाईल. विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख पटली तर लोक निर्धास्त राहतील. या उद्देशाने १६ जुलै रोजी जागतिक सर्प दिन साजरा केला जातो. (World Snake Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.