Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणाला जातीय रंग देऊ नका; संभाजी राजे छत्रपती यांचे आवाहन

184

विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमणाला कोणीही जातीय रंग देण्याचे कारण नाही, कारण आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. येथील अतिक्रमण हटवणे हाच आमचा उद्देश आहे. दुसरे म्हणजे पोलिस प्रशासनाकडून सोमवारी कारवाई केली जात आहे, त्यात सर्वात प्रथम प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे याकडे कोणीही जातीय व धर्माच्या उद्देशाने पाहू नये, असे आवाहन माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर (Vishalgad) झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांवर दगडफेक केली. तसेच त्या परिसरात असलेल्या वाहनांची जाळपोळही करण्यात आली. आता याप्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीराजेंसह 500 जणांवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संभाजीराजे हे शाहूवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाले. सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल झाला की नाही याची माहिती मला पोलिसांनी दिली नाही. परंतु मी पोलिसांना सांगितले की, विशाळगड प्रकरणावरुन तुम्ही शिवभक्तांना जबाबदार धरू नका, त्याचा सर्व दोष माझ्यावर लावा, पण पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

(हेही वाचा मध्य प्रदेशातील धार भोजशाळेचा ASI सर्वे आला समोर; हिंदू मंदिर असल्याचे १७०० अवशेष सापडले)

मी आक्रमक का झालो हेही महत्त्वाचे

मी आक्रमक होतो पण मी माझ्या स्वर्थासाठी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावर (Vishalgad) झालेल्या अतिक्रमणामुळे आक्रमक झालो, या सगळ्यासाठी मी आक्रमक झालो असेल तर मला गर्व असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. खासदार शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर तीव्र शब्दात निषेध केला आहे. यानंतर आता संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली.

पालकमंत्र्यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये

तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. त्यांनी मला पुरोगामित्व शिकवू नये, मी शाहू महाराजांच्याच घरात जन्माला आलेलो आहे. तर पालकमंत्र्यांनी मला कोट करून बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असेही माजी खासदार संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

विशाळगड अतिक्रमण वाद काय?

पुण्याचे रवींद्र पडवळ याच्या नेतृत्वाखाली आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर (Vishalgad) आणि विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. मात्र या आंदोलनाला गालबोट लागले आणि दगडफेक, जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आता याप्रकरणी कोल्हापूर पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.