मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याचे सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झालेले असून लवकरच या अभियंता भरतीची जाहिरात प्रकाशित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात ही भरती आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळेच अडली गेल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेने या भरतीसाठी बिंदुनामावली ठरवून आरक्षण निहाय प्रवर्गासाठी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मराठा आरक्षणासंदर्भातील परिपत्रक जारी झाल्याने त्यानुसार नव्याने प्रक्रिया राबण्यासाठी या भरतीला विलंब झाल्याचे बोलले जात आहे. (BMC)
महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/ वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेतील ही ६६४ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याकरता आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणूक यापूर्वीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून शासनाच्या मान्यतेनंतर आता लवकरच याची जाहिरात प्रकाशित केली जाईल आणि त्यातील अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाणार असे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहिर केले होते. (BMC)
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांची सुटका रखडली; ईडीने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिले होते आव्हान)
इतक्या रुपयांचा सेवा शुल्क अंदाजित
या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, सिव्हील-२३६ पदे, कनिष्ठ अभियंता, एम अँड ई-११६ पदे, दुय्यम अभियंता सिव्हील-२३३ पदे, दुय्यम अभियंता, एम अँड ई-७७ पदे व वास्तूविशारद ९ पदे अशाप्रकारे एकूण पदे भरली जाणार आहे. या भरतीसंदर्भात आरक्षण तसेच बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्राधिकरणाची पडताळची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही दिवसांमध्येही ही प्रक्रिया पूण झाल्यानंतर याची जाहिरात प्रकाशित केली जाईल असे नगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले होते. (BMC)
या भरती प्रक्रियेमध्ये सुमारे सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज आहे. या पदांसाठी अंदाजित १ लाख २५ हजार अर्ज प्राप्त होतील असे गृहीत धरून यासाठी १० कोटी ७५ लाख १२ हजार रुपयांचा सेवा शुल्क अंदाजित करण्यात आला. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनुसार, महापालिकेच्या या अभियत्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी काही आरक्षण ठेवणे आवश्यक आहे, आणि त्याबाबतचे आदेश महापालिकेला प्राप्त झाल्यानेच ही भरती रखडली गेल्याचे बोलले जात आहे. जर मराठा आरक्षणासंदर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त झाले नसते तर महापालिकेने एव्हाना ही जाहिरात प्रकाशित करून ही भरती झाली असती. मार्च २०२४मध्ये शासनाकडून याबाबतचा शासन आदेश प्राप्त झाल्यामुळे या भरतीत त्यानुसारच आरक्षण कोटा ठेवून ही भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने आता शासन निर्णयानुसारच आरक्षण कोटा ठरवून भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पूर्वी ६६४ रिक्त पदांसाठी होणारी ही भरती आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत निवृत्त होणऱ्या अभियंत्यांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाईल, असे बोलले जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community