Pradhan Mantri Pik Bima Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता! एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी जुलैच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ 

153
Pradhan Mantri Pik Bima Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता! एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी जुलैच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ 
Pradhan Mantri Pik Bima Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता! एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी जुलैच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची सोमवार (दि. १५ जुलै) ही अंतिम मुदत होती. मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (State Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली. (Pradhan Mantri Pik Bima Yojana)

(हेही वाचा – Cement Concrete Road : वांद्रे पश्चिम रंगशारदा परिसरातील रस्ते अडकले वादात?, निविदा प्रक्रियेवर संशय)

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच असून मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.  (Pradhan Mantri Pik Bima Yojana)

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांची सुटका रखडली; ईडीने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिले होते आव्हान)

त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा (Ek Rupayaa Pik Bima Yojna) भरण्याचे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. (Pradhan Mantri Pik Bima Yojana)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.