शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवार, 15 जुलै रोजी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबियांचे निमंत्रण स्वीकारले. या भेटीवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत दुःख जाणार नाही, अशा शब्दात शंकराचार्य यांनी खंत व्यक्त केली.
दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सातत्याने भाजपकडून हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप केला जात आहे. आता, ज्योतीर्मठाच्या शंकराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या आरोपाला अस्सखलीत उत्तर दिले. त्यामुळे, या भेटीवर भाजपची नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणाला जातीय रंग देऊ नका; संभाजी राजे छत्रपती यांचे आवाहन)
काय म्हणाले आशिष शेलार?
शंकराचार्यांच्या विधानावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांच्या विधानावर टिप्पणी करणार नाही, माझी तेवढी लायकी नाही. पण मुंबई व महाराष्ट्रात स्पष्टता आहे की, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदूत्व सोडले आहे. ठराविक मतांचं लांगुलचालन करण्यासाठी त्यांनी हिंदूत्व व बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
काय म्हणाले शंकराचार्य?
आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे. सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे, याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.
Join Our WhatsApp Community