IAS Pooja Khedekar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण आता थेट पीएमओकडे!

210
IAS Pooja Khedekar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण आता थेट पीएमओकडे!
IAS Pooja Khedekar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण आता थेट पीएमओकडे!

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Trainee IAS Officer Pooja Khedkar) यांचे दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे आता दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात (Delhi PMO Office) पोहचले आहेत. या प्रकरणाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल पाठवण्याचे आदेश पीएमओने दिले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (IAS Pooja Khedekar)

(हेही वाचा – Pradhan Mantri Pik Bima Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता! एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी जुलैच्या ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ )

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा होत आहे. ती आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. हो पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी असतांना त्यांचे विविध कारनामे चांगलेच चर्चेत आले. तेथील जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे सर्व प्रकरण बाहेर येत आहे. दररोज नवनवे खुलासे आणि प्रकरण पूजा खेडकर यांच्या संदर्भात बाहेर येत आहेत. पुणे येथे प्रक्षिणार्थी अधिकारी असताना गाडी, कॅबिन, गाडीवर अंबर दिवा (Amber lamp), अधिकाऱ्यांना धमकवणे असे प्रकार पूजा खेडकर यांनी केले होते. त्यांचे हे सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. तक्रारीनंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. मात्र त्यांची दररोजच चर्चा सुरू आहे. आता त्यांचे कारनामे थेट दिल्लीच्या पीएमओ कार्यालयात पोहचले आहेत. (IAS Pooja Khedekar)

(हेही वाचा –शंकराचार्यांनी ‘मातोश्री’वर केली पूजा; भाजपा म्हणते, तरीही Uddhav Thackeray यांनी हिंदुत्व सोडले आहेच…)

वेगवेगळ्या प्रकारे वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या सर्व प्रकरणाची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पाठवा, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. थेट पीएमओ कार्यालयाने अहवाल मागवल्याने आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासले जाण्याची शक्यता आहे. (IAS Pooja Khedekar)

तर कारवाई होऊ शकते!

पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले. त्या कोट्यातून त्यांना नोकरी मिळाली. परंतु वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिले नाही. मग यूपीएससी परीक्षा देतानाच त्यांना अपंगत्व आला होते का? असा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते. हे पाहावे लागणार आहे. तर पूजा खेडकर यांनी खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन हा बोर्ड लावला. तसेच त्या गाडीला अंबर दिवा लावला. यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारवर 27 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. तो दंड त्यांनी आता भरला आहे. (IAS Pooja Khedekar)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.