शानदार खेळीने कारकीर्द गाजवणारे माजी हॉकी खेळाडू आणि भारताचे कर्णधार Dhanraj Pillay

धनराज पिल्ले यांचा जन्म १६ जुलै १९६८ साली महाराष्ट्रात पुणे येथे राहणाऱ्या एका तामिळ हिंदू कुटुंबात झाला.

312
शानदार खेळीने कारकीर्द गाजवणारे माजी हॉकी खेळाडू आणि भारताचे कर्णधार Dhanraj Pillay
शानदार खेळीने कारकीर्द गाजवणारे माजी हॉकी खेळाडू आणि भारताचे कर्णधार Dhanraj Pillay

धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) यांचा जन्म १६ जुलै १९६८ साली महाराष्ट्रात पुणे येथे राहणाऱ्या एका तामिळ हिंदू कुटुंबात झाला. धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) हे एक माजी हॉकी खेळाडू आहेत. ते हॉकीच्या भारतीय संघाचे कर्णधारही होते. ते मुंबईत एअर इंडियाध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचं काम पाहत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांपासून धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) हे गुजरातमधल्या सरकारी अनुदान असलेल्या एस.ए.जी. हॉकी अकॅडमीचंही काम पाहत आहेत. धनराज पिल्ले यांना हॉकीच्या भारतीय संघातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखलं जातं.

धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) यांनी १९८९ साली पहिल्यांदा भारतीय हॉकी संघातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते भारतीय हॉकी संघाकडून पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ हॉकी खेळले आहेत. त्यांच्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी भारतीय संघातर्फे जवळजवळ ४०० हॉकीचे सामने खेळले आणि अंदाजे १७० गोल केले आहेत.

(हेही वाचा – Zomato आणि Swiggy वरून खाद्यपदार्थ ऑर्डर करणे आता महागले…)

धनराज पिल्ले हे भारतासाठी ४ ऑलिम्पिक सामने, तसेच वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुद्धा खेळले आहेत. याव्यतिरिक्त ते मलेशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि जर्मनी यांसारख्या देशातल्या क्लबसाठीही खेळले आहेत. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातल्या कामगिरीसाठी २००० साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

पद्मश्री पुरस्काराव्यतिरिक्त धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) यांना १९९९ ते २००० सालादरम्यान भारतातला सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी १९९८ सालच्या एशियन गेम्स आणि नंतर २००३ सालच्या एशियन कप स्पर्धांच्या विजेत्या संघाचे कर्नधार म्हणून त्यांनी नेतृत्व केलं होतं.

तसेच २००२ साली कोलोन, जर्मनी येथे भरवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धांमध्ये धनराज पिल्ले यांना टुर्नमेंट मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला होता आणि २०१७ साली ईस्ट बंगालने धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) यांना भारत गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.