- ऋजुता लुकतुके
क्रिकेटमध्ये सध्या पाकिस्तानमध्ये २०२५ मध्ये होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हा चर्चेचा विषय आहे. त्यातही पाकिस्तानच्या भूमीवर भारतीय संघ खेळणार का, हा प्रश्न आहे. पाकिस्तानने स्पर्धेची पूर्ण तयारी चालवली आहे. रावळपिंडी, कराची आणि लाहोर या तीन ठिकाणी स्पर्धा भरवण्याचा त्यांचा मानस आहे. पण, भारताच्या सहभागावरून त्यांची कोंडी झाली आहे. (Champions Trophy 2025)
बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये प्रवासासाठी भारत सरकारची परवानगी लागते. ती सरकार देत नसल्याचं आयसीसी आणि पाक बोर्डाला सांगितलं आहे. पण, पाक बोर्डाने त्यावर ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर,’ अशी भूमिका घेतली आहे. म्हणजे सरकारने परवानगी नाकारल्याचं पत्र किंवा इतर पुरावा भारताने सादर करावा, असं पाक बोर्डाचं म्हणणं आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Kerala : चेकअपसाठी रुग्णालयात आला आणि लिफ्टमध्ये अडकला; दोन दिवसांनी सुटका)
भारताने पाकमध्ये खेळावं, पाकिस्तानचा आग्रह
२००८ पासून सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. गेल्यावर्षी आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये झाली, तेव्हाही भारताचे सामने श्रीलंकेत झाले. पण, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं आर्थिक नुकसान झाल्याचा पाक बोर्डाचा दावा आहे. चॅम्पियन्स करंडकासाठी त्यांना देशाबाहेर सामने भरवायचे नाहीत. त्यामुळे भारतीय संघाचा सहभाग तर हवा. पण, भारताने पाकमध्ये खेळावं, असा पाकिस्तानचा आग्रह आहे. (Champions Trophy 2025)
आणि अजून तरी ही कोंडी फुटलेली नाही. पाकिस्तानमध्ये २००८ साली श्रीलंकन संघ असलेल्या हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून तिथे आंतरराष्ट्रीय मालिका फारशा झालेल्या नाहीत. तर १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर पाकिस्तानने ही पहिली मोठी आयसीसी स्पर्धा भरवण्याचं ठरवलं आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community