काळाराम मंदीर (Kalaram Temple) सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते. सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते. पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे. मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
(हेही वाचा – Kedarnath Dham एक आणि एकच राहणार; दिल्लीतील मंदिराच्या भूमिपूजनानंतर धामी असे का म्हणाले ?)
मंदिराचा प्राचीन इतिहास
श्रीरामरक्षेतील वरील श्र्लोका प्रमाणे गर्भगृहात मध्यभागी श्री प्रभुराम त्यांच्या उजव्या बाजुस लक्ष्मण व डाव्या बाजुस सिता ह्यांच्या मुर्ती असून समोरील सभामंडपात दास मारूती ‘श्री राम जय राम जय जय राम’ असा जप करीत हात जोडून प्रभु सेवेसाठी उभा आहे. या सभामंडपातील मारूतीची मूर्तीची दृष्टी साध्यता प्रभुरामचंद्रांच्या चरणांशी खीळलेली आहे.
मंदिरातील मूर्ती प्राचीन असून कमीत कमी दहाव्या शतकाच्या पूर्वीच्या असाव्यात.
१. श्रीचक्रधरस्वामी तेराव्या शतकात पंचवटीतील राममंदिरात येवून गेल्याचा उल्लेख लिला चरित्रात सापडतो.
गोसावी नाशिकासि बीजे केले पंचवटीये अवस्थान आले दीस दोनचारी ( एकीवासना ) रामाच्या देऊळी उद्येचिये देउळी उद्येयाचिये वेळी चौकी आसन जाल्हे
२. संत एकनाथ महाराज (१५९९) काळाराम मंदिरात श्रीराम प्रभुच्या दर्शनाला आले होते. त्या संदर्भात काव्य या श्री प्रभुरामांचे साक्षीने लिहीले.
श्री गुरूदत्तात्रे यांच्या सगुन सात्काराने एकनाथांना सिध्दावस्था प्राप्त झाली. श्री जनार्दनस्वामिंनी त्यांना तिर्थाट करन्याचा सल्ला दिला तिर्थाटन करून परत आल्यावर नाथांनी सदगुरूंचे दर्शन घेतले तदनंतर नाशिक येथे पंचवटीत जाऊन प्रभु श्रीरामचंद्राचे दर्शन घ्यावे अशी उत्कठ इच्छा निर्माण झाल्याने गुरूशिष्याची जोडी नाशिकला निघाली वाटेत चंद्रभट नामक एका विद्वान ब्राम्हणाच्याघरी त्यांनी मुक्काम केला. वे. शा. स. चंद्रभट उत्तम प्रवचनकार होते. त्यांनी त्या रात्री चतुश्र्लोकी भागवतावर भावपूर्ण शब्दात निरूपण केले गुरूशिष्याने तन्मयतेने ते श्रवण केले. पुढे नाशिक येथील प्रभु श्रीरामांच्या साक्षीणे स्वामिनी नाथांना चतुश्र्लोकी भागवतावर प्राकृत भाषेत टीका लिहीण्याची आज्ञा केली. गुरूआज्ञा शिरोधार्थ मानून नाथांनी चतुश्र्लोकी भागवतावर प्राकृत भाषेत ओविबध्द टिका लिहीली. सदगुरू जनार्दनस्वामिंच्या आदेशानुसार नाथांनी लिहीलेला हा पहिला ग्रंथ. त्रंबकेश्वर येथे महा. सदगुरूंच्या सानिध्यात पूर्णत्वास गेला (श्रीराम भागवत पुरानातील संदर्भानुसार भगवंतानी ब्रम्हदेवास प्रथमतः चतुश्र्लोकी भागवत सांगीतले)
३. श्री समर्थ रामदास स्वामींना याच श्रीराम प्रभुंच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला. त्या संदर्भात…
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आधीदैवत श्री समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर असिम श्रध्दा श्री समर्थांनी लग्नमंडपात सावधान हा शब्दऐकल्यावर आपले गाव जांब येथून पलायन केले व नाशिकला आले. पंचवटीत आले याच श्री प्रभुंच्या मंदिरात आले. त्यावेळीपण ह्याच श्रीराम लक्ष्मण सीता व समोर हनुमान या मुर्ती होत्या मंदिर लाकडी होते पण भव्य होते. मंदिरात प्रवेश करताच त्यांचे सर्वांग रोमांचीत झाले. अःतकरणाच्या पात्रातून अष्टसात्वि भावांची गोदावरी भरभरून वाहू लागली इथेच त्यांना रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन झाले. महाविर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले त्याचीच एक झलक रामदास स्वामींना या काळाराम मंदिरात अनुभवली नाशिक पंचवटीत काळाराम मंदिरात समर्थांना श्रीराम प्रभुंना साक्षात्कार झाला व त्यांच्या नवजिवनाचा भावपूर्ण शुभारंभ झाला.
४. श्री समर्थ पंचवटीपासून जवळच अंदाजे ३ कि. मी. अंतरावर असलेल्या टाकळी या गावी मुक्कामास होते. टाकळीत रात्री मुक्काम करावा सकाळी उठून नंदिनी नदिच्या तीरावर स्नान संध्या करावी दररोज बाराशे सुर्यनमस्कार घालावे त्यानंतर पाण्यात उभे राहून दोन तास गायत्री मंत्राचा जप करावा. साडेबारा वाजेपर्यंत रामनामाचा जप करावा दुपारी मधुकरीसाठी पंचवटीत यावे नंतर काळाराम मंदिरात प्रवचने ऐकावीत. नाशकातील विद्वान मंडळीच्यां संग्रहातील ग्रंथाचा धांडोळा घ्यावा आणि रात्री पुन्हा टाकळीला परतावे असा त्यांचा दिनक्रम असे त्याकाळी बारा महिने चालणार्याथ किर्तन प्रवचनांसाठी काळाराम मंदिर प्रसिध्द होते. श्री समर्थ रामदास स्वामिंचा हा काळ इ. सन १६२० ते इ. सन. १६३२ असा आहे.
श्री समर्थ इ.सन १६४४ मध्ये कृष्णातिरी आल्यानंतर दोन चार वर्षातच त्यांनी पंचवटीच्या रामउपासकांना पत्र लिहीले आहे. या पत्रात समर्थांची अत्यंत मधुरभक्ती कोमल वाणीने प्रकट झाली आहे. जेथे पडाली कृपादृष्टी रघुत्तमरायाची यावरून श्रीरामांच्या साक्षात्काराचे हे पुण्यस्थळ श्री काळाराम मंदिर समर्थांना परमप्रिय वाटत आहे. या पत्रात समर्थ म्हणतात….
जतनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी |
जेथे पडली कृपादृष्टी | रघूत्तमरायाची ||१ ||
प्रत्यकी माझा नमस्कार | देवासी करावा निरंतर |
मजकारणे शरीर | इतुके कष्टवावे ||९ ||
४) संतश्रेष्ट श्री गजानन महाराज (शेगाव) श्री काळाराम मंदिरात येऊन गेले व त्यांना श्री रामप्रभुंचा साक्षात्कार झाला. त्यासंदर्भात….
संतश्रष्ट श्री गजानन महाराज ( शेगाव) २३ फब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारूण्य दशेत शेगावी दिसले व ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधिस्त झाले.
श्री गजानन विजयः अध्याय ११ वा
श्री गजानन महाराज काळाराम मंदिरात आले व येथे त्यांचे परम मित्र श्री नृसिंह महाराज (गोपाळदास महाराज यांना भेटले) त्या संदर्भात श्री गजानन विजय या ग्रंथात अध्याय क्रमांक ११ मध्ये खालील प्रमाणे उल्लेख आहे…….
मग ती मंडळी निघाली | शेगावहिणी भली |
शिवरात्रीस येती झाली | त्रंबकेश्र्वरी कारणे ||८२ ||
कुशावर्ती केले स्नान | घेतले तयाचे दर्शन |
गंगाव्दार जाऊन | पुजन केले गौतमीचे ||८३||
वंदिली माय निलांबिका | तेवी गहणी निवृत्तीनाथ देखा
तेथून आपले नाशिका | गोपाल दासास भेटावया || ८४||
हा गोपालदास महंत | काळाराम मंदिरात |
धुनी लाऊन व्दारात | पंचवटीच्या बसलासे||८५ ||
राम मंदिरासमोर | एक पिंपळाचा होता पार |
शिष्यासहित साधुवर | तेथे जाऊन बैसले||८६||
गोपालदास आनंदि झाले | बोलले जवळच्या मंडळीस |
उत्तम माझा बंधू आला | वर्हा डातून गजानन ||८७||
जाहया त्याचे दर्शन | अनन्यभावे करून |
माझी ही भेट म्हणून | नारळ साखर त्याशी द्या ||८८||
हा घर आला कंठात | तो मी एक साक्षात |
देह भिन्न म्हणून | नारळ साखर त्याशी द्या ||८९
शिष्यांनी तैसेच केले | दर्शन घ्याया अवघे आले
केठा माजी घातिले | दिलेल्या पुष्पहाराला ||९०||
नारळ आणि खडीसाखर | ढोविली स्वामिसमोर |
ती पाहुन गुरूवर | ऐसे बोलले भास्कराला ||९१||
हा प्रसाद अवघ्याशी वाटी | परी म होऊ देई दाटी |
माझ्या बंधूनची झाली भेटी | आज या पंचवटीत ||९२||
याच वेळी श्री गजानन महाराज श्री प्रभुरामचंद्राचे दिव्य दर्शन साक्षात्कार झाल्याचा उल्लेखही आढळतो.
(संदर्भ : श्री काळाराम मंदिराचे संकेतस्थळ)
कसे जाल ?
हवाई मार्गे
सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे द्वारे
जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड 10 किमी आहे.
रस्त्याने
शहरात आणि नाशिक सेंट्रल बस स्थानकापासून 3 कि.मी. (Kalaram Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community