- ऋजुता लुकतुके
फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागलेला राफेल नदाल टेनिस कोर्टवर पुन्हा परतला आहे. यावेळी बस्ताद इथं तो कॅस्पर रुडच्या साथीने दुहेरी खेळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकची तयारी म्हणून तो या स्पर्धेकडे बघत आहे. नदाल आणि रुड यांना स्पर्धेचं वाईल्ड कार्ड मिळालं आहे. ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धा क्ले कोर्टवर होणार आहे. आणि या स्विडिश स्पर्धेतही क्ले कोर्ट आहे. त्यामुळे नदालने या स्पर्धेची निवड केली असवी. (Rafael Nadal)
रुड आणि नदालला बस्ताद स्पर्धेत वर्चस्व राखणं कठीण गेलं नाही. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. पण, त्यामुळे नदालला फारसा फरक पडला नाही. दोघांनी पहिल्या सेटपासून विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली. दोन्ही सेटमध्ये प्रत्येकी दोन ब्रेक मिळवत त्यांनी ७९ मिनिटांत हा सामना ६-१, ६-४ असा जिंकला. विशेष म्हणजे त्यांची प्रतिस्पर्धी जोडी स्पर्धेतील द्वितीय मानांकीत गायडो आंद्रेझियो आणि मिगेल व्हेरेला ही होती. (Rafael Nadal)
(हेही वाचा – Harbhajan Apologizes : दिव्यांगांची नक्कल करणाऱ्या व्हिडिओवरून युवराज, हरभजन आणि रैनाविरुद्ध पोलीस तक्रार)
नदाल आणि रुड हे दोघं नदालच्या मोलोर्का इथं असलेल्या टेनिस अकादमीत सराव करतात. रुड हा तिथलाच प्रशिक्षणार्थी आहे. दोघं ऑलिम्पिकमध्ये स्पेनचं प्रतिनिधित्व करणार आहेत. (Rafael Nadal)
‘आम्ही पहिल्यांदाच एकत्र खेळत होतो. त्यामुळे आमची जोडी चांगली जमतेय, हे इथं जास्त महत्त्वाचं आहे. आमचा खेळ एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे आम्ही ऑलिम्पिकमध्येही आव्हान उभं करू शकू,’ असं पहिल्या सामन्यानंतर नदाल मीडियाशी बोलताना म्हणाला. नदाल २० वर्षांनंतर बस्ताद इथं खेळत होता. यापूर्वी २००५ मध्ये १९ वर्षांचा असताना त्याने इथं एकेरी स्पर्धा जिंकली होती. (Rafael Nadal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community