राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी (१६ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शरद पवार गटाने ही याचिका दाखल केली होती. (Supreme Court)
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील पक्ष आणि निवडणूक चिन्हाची लढाई आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. (Supreme Court)
अशात, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याबाबत माहिती देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज सुनावणी झाल्याचे पत्रकारांना सांगितले. (Supreme Court)
(हेही वाचा – Congress मध्ये धुसफूस; विधान परिषद निवडणुकीनंतर नाराज आमदारांविषयी चर्चेला उधाण)
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. यानंतर शरद पवार गटाला जोडपत्र दाखल करायचे असेल तर त्यासाठी सुध्दा एक आठवड्याचा वेळ दिला जाईल. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. (Supreme Court)
दरम्यान, या प्रकरणाचा निकाल चार पाच सुनावणीनंतर लागेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे मते आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Supreme Court)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community