मरावे परी कीर्ती रुपी उरावे, अशी मराठीतील म्हणीचा प्रत्यय येणारा प्रसंग नेरळकरांनी अनुभवाला आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे मराठीतील सुप्रसिद्ध लेखक स्व. नारायण सुर्वे यांचे घर आहे, सध्या त्यामध्ये त्यांची मुलगी आणि जावई राहतात. त्यांचे घर १० दिवस बंद असल्याने चोरट्याने (Theft) घरातील मौल्यवान वस्तू चोरल्या, पण घर नारायण सुर्वे यांचे असल्याचे लक्षात येताच त्याने चोरलेल्या वस्तू परत आणून ठेवल्या आणि लेखी माफीही मागितली.
रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील नारायण सुर्वे यांच्या घरातून चोरट्याने (Theft) मौल्यवान वस्तू चोरल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मंगळवारी, 16 जुलै रोजी दिली. नारायण सुर्वे हे मराठीतील प्रसिद्ध कवी आणि समाजसेवक होते. सुर्वे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी सुजाता आणि त्यांचे पती गणेश घारे आता या घरात राहतात. नुकतेच ते विरारला त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते आणि त्यांचे घर 10 दिवसांपासून बंद होते. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्याने घरात घुसून एलईडी टीव्हीसह मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.
(हेही वाचा Congress मध्ये धुसफूस; विधान परिषद निवडणुकीनंतर नाराज आमदारांविषयी चर्चेला उधाण )
दुसऱ्या दिवशी चोरटा आणखी काही वस्तू चोरण्यासाठी आला असता त्याला एका खोलीत नारायण सुर्वे यांचा फोटो आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी दिसल्या. तेव्हा चोराला (Theft) कळाले की, हे एका प्रसिद्ध कवीचे घर आहे. यानंतर चोराला पश्चात्ताप झाला आणि त्याने जे काही सामान उचलले होते ते परत जागेवर आणून ठेवले.
चोराने लेखी माफीही मागितली
चोराने भिंतीवर एक छोटी चिठ्ठी चिकटवली, ज्यामध्ये त्याने महान साहित्यिकाच्या घरातून चोरी केल्याबद्दल मालकाची माफी मागितली. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी सांगितले की, सुजाता आणि त्यांचे पती रविवारी (14 जुलै) विरारहून घरी परतले असता त्यांना ही चिठ्ठी सापडली. टीव्ही सेटवरून सापडलेल्या बोटांच्या ठशांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community