RBI to Lenders : थकित कर्जाच्या प्रकरणांना घोटाळ्याचं नाव देण्यापूर्वी आधी कर्जधारकांशी संवाद साधा – रिझर्व्ह बँक

RBI to Lenders : थकित कर्जाच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेनं वित्तीय संस्थांना खरमरीत इशारा दिला आहे.

224
RBI to Lenders : थकित कर्जाच्या प्रकरणांना घोटाळ्याचं नाव देण्यापूर्वी आधी कर्जधारकांशी संवाद साधा - रिझर्व्ह बँक
  • ऋजुता लुकतुके

थकित कर्जांना घोटाळ्याचं नाव देण्यापूर्वी कर्जबाजारी लोकांशी नीट संवाद साधा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, असं रिझर्व्ह बँकेनं वित्तीय संस्थांना सुचवलं आहे. कर्ज धोटाळ्याचं नाव देण्यापूर्वी या लोकांना आधी २१ दिवसांची कारणे दाखवा नोटीस द्या. त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग पुढील कारवाई करा, असं रिझर्व्ह बँकेनं ताज्या पत्रकात म्हटलं आहे. (RBI to Lenders)

मार्च २०२३ मध्ये एका प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने थकित कर्जाविषयी बँकांचं वागणं संवेदनशील असावं, असं म्हटलं होतं. यात कर्जबाजारी लोकांनाही त्यांचं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं या प्रक्रियेचा फेरआढावा घेऊन नवीन मार्गदर्शक तत्त्व लागू केली आहेत. (RBI to Lenders)

(हेही वाचा – Supreme Court : राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी)

सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देताना थकित कर्ज असलेल्यांनाही नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर मध्यवर्ती बँकेनं काही मूलभूत बदल केले आहेत. बँक किंवा वित्तीय संस्थांनी थकित कर्जांविषयीचं आपलं धोरण दर तीन वर्षांनी पुन्हा तपासून पाहावं, असं म्हटलं आहे. (RBI to Lenders)

शिवाय कर्जाचं खातं बुडित जाण्यापूर्वी कर्जधारकांना बँकेचे नियम आणि इतर गोष्टींची माहिती द्यावी, कर्ज बुडित खात्यात जात असल्याचा इशारा वेळोवेळी द्यावा, असं मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे. ग्रामीण बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह बँक जास्त कणखर भूमिका घेताना दिसत आहे. (RBI to Lenders)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.