Ashadhi Ekadashi निमित्त पंढरपूरसाठी विशेष ट्रेन रवाना

97
Ashadhi Ekadashi निमित्त पंढरपूरसाठी विशेष ट्रेन रवाना

आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून “विठ्ठल विठ्ठल” च्या दैवी जयघोषात आणि भक्तांच्या भजनाच्या गजरात पंढरपूरसाठी विशेष गाडी रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा सदस्य आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. (Ashadhi Ekadashi)

एफटीआर (संपूर्ण टॅरिफ दर) आधारावर विशेष ट्रेन क्र. ००१२३ दि. १६.७.२०२४ रोजी १५.४४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघाली आणि दि. १७.७.२०२४ रोजी ०३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, हि ट्रेन पंढरपूर येथून दि. १८.७.२०२४ रोजी १०.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ठाणे स्थानकावरही भाविकांच्या प्रवेशासाठी येण्या आणि जाण्यासाठी थांबे देण्यात आले आहेत. (Ashadhi Ekadashi)

(हेही वाचा – महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव Manoj Saunik यांची नियुक्ती)

ही विशेष गाडी आषाढी एकादशी उत्सवासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना मोठ्या संख्येने सेवा देईल. यावेळी शांती भूषण, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) आणि मुंबई विभागाचे इतर वरिष्ठ शाखा अधिकारी उपस्थित होते. (Ashadhi Ekadashi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.