पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या नालेसफाईचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. परंतु पश्चिम माटुंगा आणि दादर हिंदु कॅलनीचा परिसर जलमय करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दादर धारावी नाल्यातील सफाईचे काम झालेले नाही. परिणामी या नाल्यातील वाहत्या पाण्याला ब्रेक लागला असून मागील काही दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याच्या शेजारील घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार अनेकदा घडल्याचे समोर आले आहे. (Dadar-Dharavi Nala)
दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान दादर धारावी नाला वाहत असून नाला या दोन्ही स्थानकांच्या मध्य व पश्चिम रेल्वेच्या मधून वाहत आहे. दादर पश्चिम रेल्वेपासून माटुंगा वर्कशॉपला जोडून वाहणारा हा दादर धारावी नाला पुढे माहिम आझाद नगर येथून पुढे शाहू नगर येथून ६० फुटी रस्त्यालगत असणाऱ्या नाल्याला जावून जोडला जातो. माटुंगा वर्कशॉप समोरील मध्य रेल्वे वसाहतीच्या प्रारंभी या नाल्यात गेट बसवण्यात आले असून या नाल्याचा एक मार्ग पश्चिम रेल्वेच्या रुळाखालून सेनापती बापट मार्गाच्या दिशेने जातो. त्यामुळे नाला तुंबल्यास या दादर ते माटुंगा आणि माहिमला जोडणारा सेनापती बापट मार्ग पाण्याखाली जातो. (Dadar-Dharavi Nala)
(हेही वाचा – IAS Pooja Khedkar यांची निवड होणार रद्द? काय म्हणतात अविनाश धर्माधिकारी?)
या नाल्याच्या शेजारी माटुंगा रोड रेल्वे स्थानकाच्या समोरील सुमारे ४०० कुटुंब वस्ती असलेल्या कमला रामन नगर ही मोठी वसाहत असून पुढे आझाद नगर, मेघवाडी या वस्त्या आहेत. परंतु या दादर धारावी नाल्याची सफाई पूर्णपणे झालेली नसून एरव्ही पाण्याचा प्रवाह सुरु राहणाऱ्या या नाल्यातील प्रवाहालाच ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांमध्ये चार ते पाच वेळा येथील कमला रामन नगर वसाहतील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहे. (Dadar-Dharavi Nala)
या कमला रामन नगरमधील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या नाल्याची सफाई सुरुवातीपासूनच झालेली नाही. याठिकाणी एक पाकलेन वाहने उभे करून ठेवले आहे. हे पोकलेन वाहने नाल्यात उतरवण्यासाठी आधी त्यात नाल्यात डेब्रीज टाकले जाते आणि त्यावरून पोकलेन नाल्यात उतरवले जाते. परंतु हे वाहन गाळ बाहेर काढत नसून केवळ वाहन नाल्यात तिथल्या तिथेच चालवले जात आणि वाहन बाहेर काढताना जे डेबीज नाल्यात टाकले होते, तेच डेब्रीज नाल्यातून काढून गाळ काढल्याचे दाखवले जाते. मात्र, याठिकाणी गाळ काढणारे वाहन उभे करून ठेवले असले तरी प्रत्यक्षात या नाल्याची सफाईच केली गेलेली नाही. परिणामी यंदा मागील आठ दिवसांमध्येच अनेकदा घरांमध्ये शिरले. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्यास बराच वेळ लागला होता. महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही या नाल्याची सफाईकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे महापालिका केवळ सफाई केवळ कागदावरच दाखवून कंत्राटदारांचे खिसे भरतात का असा सवाल येथील स्थानिकांनी केला आहे. (Dadar-Dharavi Nala)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community