Thane left accident: लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका  

151
Jasmine Tower: लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका  
Jasmine Tower: लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका  

बाळकुम परिसरातील जास्मिन टॉवरच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये तब्बल नऊ महिला अडकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्या महिलांना अवघ्या १० ते १५ मिनिटात सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्या महिला वसंत विहार शाळेच्या कर्मचारी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.  (Thane left accident)

(हेही वाचा – Beed Crime News: लग्नासाठी आले अन् दागिने चोरी करून पळाले  

जास्मिन टॉवर ही तळ अधिक १८ मजली व अंडरग्राउंड पार्किंग अशी इमारत आहे. या इमारतीच्या ११ व्या मजल्यावर त्या नऊ महिला एकत्र जात असताना पहिल्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेत, अवघ्या १० ते १५ मिनिटात त्यांची सुखरूप सुटका केली.  (Thane left accident)

(हेही वाचा – राज्यात जातीय सलोखा राखा; Narayan Rane यांचे राजकीय पक्षांना आवाहन)

पुष्पा हासे (५७), रुपाली मराठे ( ५०), लीना नंबियार (५४), दीपिका रुपवने (४१), पूनम सिंग (३७), सुमन गायकवाड (३४), सीमा ढाकणे (४४), श्रीकला नायर (५३) आणि उमा सोनी (४०) अशा लिफ्ट मध्ये अडकलेल्या महिलांची नावे आहेत. त्या सर्व वसंत विहार शाळेच्या कर्मचारी असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली. (Thane left accident)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.