India T20 Captain : टी-२० मध्ये बीसीसीआयचा कप्तान म्हणून हार्दिकवर नाही तर ‘या’ खेळाडूवर भरवसा

India T20 Captain : आधी हार्दिक पांड्या टी-२० संघाचा कर्णधार होणार हे जवळ जवळ निश्चित होतं 

188
India T20 Captain : टी-२० मध्ये बीसीसीआयचा कप्तान म्हणून हार्दिकवर नाही तर ‘या’ खेळाडूवर भरवसा
India T20 Captain : टी-२० मध्ये बीसीसीआयचा कप्तान म्हणून हार्दिकवर नाही तर ‘या’ खेळाडूवर भरवसा
  • ऋजुता लुकतुके 

रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न होताच. पण, आताच्या टी-२० विश्वचषकात संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याची जागा घेईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, अचानक हार्दिकला मागे टाकून मुंबईकर एक नाव टी-२० संघाचा कर्णधार म्हणून समोर येत आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. तिथेच हा बदल दिसून येऊ शकतो. (India T20 Captain)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या दौऱ्यासाठी उपलब्ध आहे. पण, अजित आगरकरची (Ajit Agarkar) निवड समिती आणि नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हवा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सुर्यकुमार यादवने टी-२० संघाचं नेतृत्व केलं होतं. आणि आताही त्याच्यावरच ही जबाबदारी सोपवावी असं मत बीसीसीआयमध्ये तयार झालं आहे. (India T20 Captain)

(हेही वाचा- Photo Morphing करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या माथेफिरूला तरुणीने दिला चोप)

नवीन कर्णधार हा २०२६ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत असेल असं बीसीसीआयचं (BCCI) नियोजन आहे. आणि तोच विचार करून गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी हार्दिकशी चर्चाही केल्याचं समजतंय. पांड्याने अष्टपैलू कामगिरी करत टी-२० विश्वचषक विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. त्याने १४४ धावा आणि ९ बळी मिळवले. (India T20 Captain)

‘रोहितच्या संघात हार्दिक उपकप्तान होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पण, निवड समितीची पसंती याक्षणी सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दिसत आहे. तसं मत निवड समितीच्या सदस्यांमध्ये तयार झालं आहे. लंकेचा दौराच नाही तर विश्वचषकापर्यंत तोच कर्णधार रहावा अशी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचीही इच्छा आहे,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी नाव न उघड करण्याच्या बोलीवर पीटीआयला ही माहिती दिली आहे. (India T20 Captain)

(हेही वाचा- महापालिकेचे धोरण मान्य करावे लागेल; SC च्या आदेशानंतर Central, Western Railway अवाढव्य Hoardings हटविणार)

हार्दिकने खाजगी कारणावरून श्रीलंका दौऱ्यावरून (Sri Lanka tours) माघार घेतली आहे. तिथे पहिल्यांदा सूर्यकुमार आपल्याला टी-२० मध्ये कप्तानी करताना दिसेल. सूर्यकुमार काही वर्षँ कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून गंभीरच्या कप्तानीखाली खेळला आहे. हे आणखी एक कारण आहे, त्याचा कप्तानीसाठी विचार होण्यासाठी. (India T20 Captain)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.