पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो
वडाळा, मुंबई येथे ४६० वर्षांपूर्वीचे प्रति पंढरपूर असलेले विठ्ठलाचे देऊळ आहे.
येथे काही भक्तगणांनी रोज ज्ञानेश्वरी वाचनाचा व हरिपाठ पठनाची परंपरा चालवली आहे.
या विठ्ठ्ल मंदिरात गणेशाचीही मूर्ती आहे.
या विठ्ठ्ल मंदिरात शिवपिंड आहे. भाविक त्याचे दर्शन घेऊ शकतात.
या विठ्ठ्ल मंदिरात विष्णुभक्त गरूडाचीही मूर्ती आहे.
तुळशीहार व इतर फुलांच्या हारांनी सजवलेल्या विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्ती मनोहारी दिसतात.