Mohammed Shami : दुखापतीनंतर मोहम्मद शमी नेट्समध्ये परतला

Mohammed Shami : मोहम्मद शमी नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात दिसला आहे.

146
Mohammed Shami : दुखापतीनंतर मोहम्मद शमी नेट्समध्ये परतला
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषकानंतर घोट्याच्या दुखापतीने बेजार असलेला मोहम्मद शमी बुधवारी अखेर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. नेट्समध्ये त्याने गोलंदाजीचा कसून सराव केला. सराव करतानाचा व्हिडिओ मंगळवारीही त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या दुखऱ्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाल्यापासून शमी जपून पावलं उचलत आहे. आताही तो जपूनच गोलंदाजी करताना दिसला. (Mohammed Shami)

(हेही वाचा – Sumit Nagal : सुमित नागल जागतिक क्रमवारीत ६८ व्या स्थानावर पोहोचला)

शमी ८ महिने क्रिकेटपासून होता दूर

मार्च महिन्यात शमीच्या घोट्यावर दक्षिण आफ्रिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, त्यानंतर आतापर्यंत तो सरावही करू शकलेला नव्हता. आयपीएल आणि पाठोपाठ टी-२० विश्वचषकातही तो खेळला नाही. एकदिवसीय विश्वचषकात त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. २२ बळींसह तो सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला होता. पण, त्यानंतर लगेचच त्याला चालताना त्रास व्हायला लागला आणि दुखापतीचं निदानही उशिरा झालं. (Mohammed Shami)

सुरुवातीला विश्रांतीने बरी होईल, अशी वाटलेली ही दुखापत शस्त्रक्रियेपर्यंत गेली. एकदिवसीय विश्वचषकानंतरचा दक्षिण आफ्रिका दौरा आणि इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका तो खेळू शकला नाही. जवळ जवळ ८ महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यावर आता त्याने सराव सुरू केला आहे. आताही त्याचं वय आणि तंदुरुस्ती पाहता, तो तीनही प्रकारात खेळेल का, कुठली मालिका निवडेल यावर बीसीसीआयला त्याच्याशी चर्चा करावी लागणार आहे. (Mohammed Shami)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.