- ऋजुता लुकतुके
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी अर्थ मंत्रालयात अर्थसंकल्पापूर्वीच्या हलवा कार्यक्रमात सहभाग घेतला. परंपरेनुसार त्यांनी अर्थसंकल्प तयार झाला की, हलवा हा गोड पदार्थ बनवून तो सर्व कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना खिलवला जातो. अर्थसंकल्प तयार झाल्याचं हे द्योतक आहे. त्यानुसार लाल रंगानी झाकलेलं हलव्याचं पातेलं उघडून सीतारमण यांनी तो अर्थसंकल्प बनवणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना दिला आणि हा समारंभ पार पडला. (Budget 2024)
त्याचवेळी सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं मुद्रण कसं सुरू आहे याचाही आढावा घेतला. आता देशाचा २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प तयार असून येत्या २३ जुलैला सीतारमण तो लोकसभेत सादर करतील. त्यांचा हा सातवा पूर्ण अर्थसंकल्प असेल. अजूनही केंद्र सरकारला महागाई दराच्या समस्येशी झुंजावं लागत आहे. जून महिन्याचा महागाई दर पुन्हा एकदा ५ टक्क्यांवर गेला आहे. अशावेळी अर्थमंत्री गरीब लोकांना अनुदान म्हणून काय देतात आणि मध्यमवर्गीयांना काय दिलासा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तर देशातील घटलेला उत्पादन दरही वाढवणं गरजेचं आहे. (Budget 2024)
(हेही वाचा – Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल- आषाढी एकादशीचे काय आहे महात्म्य?)
कृषि उत्पादकता वाडवण्यासाठी केंद्र सरकार काय करतं, औद्योगिक व प्रत्यक्ष कर रचना कशी ठेवतं यावर सगळ्यांचं लक्ष असेल. आंध्र प्रदेशमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि नवीन पेट्रोकेमिकल हब उभा करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. त्याविषयी घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात भारतीय जनता पार्टीकडे पूर्ण बहुमत नसलं आणि घटक पक्षांच्या जीवावर हे सरकार उभं असलं तरी वित्तीय तूट आणि सरकारी पगारांच्या बाबतीत सरकार फारशी सूट देणार नाही आणि आपलं आधीचंच धोरण राबवेल असं दिसत आहे. (Budget 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community