Cabinet Reshuffle and Expansion : राज्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार लवकरच; कुणाला मिळणार संधी?

213
Cabinet Reshuffle and Expansion : राज्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार लवकरच; कुणाला मिळणार संधी?

गेली अडीच वर्षे रखडलेला मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार येत्या आठवडाभरात होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात १४ जागा रिक्त असून त्यातील ७-८ कॅबिनेट तर अन्य राज्यमंत्री पदे भरण्याची चाचपणी महायुती सरकारकडून केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही आमदारांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. (Cabinet Reshuffle and Expansion)

शिवसेना-राष्ट्रवादीला किती मंत्रीपदे?

राज्य मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार होता मात्र विधान परिषद निवडणुकीत मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका असल्याने विस्तार लांबला. मंत्रिमंडळातील रिक्त १४ जागांमध्ये ७-८ कॅबिनेट मंत्रीपदे भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यात भाजपाचे ३-४ तर शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यानाच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार असतील तसेच राज्यमंत्री पदासाठीही जवळपास हेच सूत्र असेल असे सांगण्यात आले. (Cabinet Reshuffle and Expansion)

(हेही वाचा – Ashadhi Ekadashi 2024 : …तेव्हा मात्र भीती वाटते; Raj Thackeray यांनी पांडुरंगाच्या चरणी कोणती प्रार्थना केली ?)

.. पुनर्वसन आणि मंत्रिपद?

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि नुकत्याच विधान परिषदेवर आमदार म्हणून पुनर्वसन झालेल्या भाजपच्या पंकजा मुंडे तसेच शिवसेनेच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या मात्र यावेळी तिकीट नाकरलेल्या विधान परिषद आमदार भावना गवळी यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार जयकुमार रावल हे अन्य दावेदार असून शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार दीर्घकाळापासून प्रलंबित आहे आणि भाजपाचे मित्रपक्ष विशेषतः शिवसेना (शिंदे) मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. (Cabinet Reshuffle and Expansion)

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या शनिवारी अजित पवारही याच मुद्द्यावर दिल्लीत गेले होते तर दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीवारी केल्याचे कळते. (Cabinet Reshuffle and Expansion)

महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या नोव्हेंबर २०२४ मध्ये संपत असून पुढील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कॅबिनेट मंत्र्यांना अवघ्या काही दिवसांची कार्यकाळ मिळणार आहे. (Cabinet Reshuffle and Expansion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.