Mukhyamantri Ladka Bhau Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी स्टायपेंड देण्याच्या योजनेची घोषणा!

254
Mukhyamantri Ladka Bhau Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी स्टायपेंड देण्याच्या योजनेची घोषणा!
Mukhyamantri Ladka Bhau Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी स्टायपेंड देण्याच्या योजनेची घोषणा!

लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी लाडक्या भावांसाठी (Mukhyamantri Ladka Bhau Yojana) स्टायपेंड देण्याच्या योजनेची घोषणा केली. बारावी पास झालेल्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, पदवी (डिग्री) झालेल्या तरुणांना महिन्याला १० हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने बोलताना जाहीर केले.

“महायुती सरकार हे गरिबांचे सरकार”

तो वर्षभर अप्रेंटशिप करेल आणि त्याला तिथे नोकरी लागले. यामु‍ळे कौशल्यपूर्ण असे मनुष्यबळ उद्योजकांना मिळेल. पण अप्रेंटशिपचे पैसे सरकार भरेल, असे शिंदे यांनी सांगितले.राज्यातील महायुती सरकार हे गरिबांचे सरकार आहे. लाडक्या बहीणसह भाऊदेखील आम्हाला लाडके आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. (Mukhyamantri Ladka Bhau Yojana)

“राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव”

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा केली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असे मागणे मागितल्याचे ते म्हणाले. (Mukhyamantri Ladka Bhau Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.