Dombivli News : मस्करीची झाली कुस्करी! तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू; व्हिडीओ व्हायरल

456
Dombivli News : मस्करीची झाली कुस्करी! तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू; व्हिडीओ व्हायरल
Dombivli News : मस्करीची झाली कुस्करी! तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू; व्हिडीओ व्हायरल

मस्करीची कुस्करी म्हणावं अशी घटना डोंबिवलीत (Dombivli News) घडली आहे. सहकार्यासोबत मस्करी करणं एका महिलेच्या जीवावर बेतल आहे. मस्करी करताना तिस-या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नगीनादेवीराम असं या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

काय घडलं ?

डोंबिवली एमआयडीसी येथील ग्लोब स्टेट इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत नगीनादेवीराम ही साफसफाईचे काम करायची. साफसफाईचे काम संपल्यावर आपल्या एका सहकाऱ्यासह ती मस्करी करत असताना अचानक तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. (Dombivli News)

नगीनादेवी राम दुपारच्या सुमारास तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि त्यांचा तोल गेला.दोघांचा तोल गेल्याने क्षणार्धात नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून तिचा मृत्यू झाला. तिची मस्करी करणारा बंटी टाक याचा देखील तोल गेला. मात्र, त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचविले. या प्रकरणी मानपाडा पोलीसांनी बंटीला सदोषमनुष्यवधा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. (Dombivli News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.