‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

136

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच ५ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली. त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार येत्या १४ जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

कोल्हापूरात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट!

आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 14 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर (लेव्हल्स) ठरवेल, असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात 20 हजार 697 ऑक्सिजन बेड्सवर रुग्ण असून ही संख्या 35 हजारांपेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. महाराष्ट्र शासनाने 4 जून रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे राज्याच्या विविध जिल्ह्यांतील भिन्न प्रशासकीय क्षेत्रांमध्ये संबंधित क्षेत्रातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनांच्या स्तरांविषयी निर्देश दिले आहेत.

स्थानिक प्रशासनांना अधिकारी!

या आदेशातील अनुच्छेद चारमध्ये राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणाची व्याख्या दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त खाटांची एकूण संख्या 20,697 इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या 35,000 पेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दिलेल्या आकडेवारीनुसार 10 जून 2021 रोजी विविध जिल्ह्यांतील ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा आणि पॉझिटीव्हीटी संख्येचा तक्ताही सोबत जोडलेला आहे. या आकडेवारीच्या आधारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी, 4 जून 2021 रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ घेऊन त्यांच्या प्रशासकीय क्षेत्रात कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत, याबाबतचा निर्णय घेऊ शकतील. एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक प्रशासकीय क्षेत्रे असल्यास त्यांनी या आकडेवारीचे प्रमाणबद्ध विभाजन करून एकएका क्षेत्राचा निर्देशांक निश्चित करावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा.

सोमवार, 14 जूनपासून अंमलबजावणी होणार!

या आदेशातील अनुच्छेद सहानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याला या आदेशात उल्लेख केलेल्या विविध कामकाजावर बंधने लागू करण्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याच्या संमतीने बदल करण्याची मुभा दिलेली आहे. पायाभूत स्तरात बदल न झाल्यास आणि सध्या लागू असलेल्या आदेशानुसार बंधनांमध्ये कोणताही बदल नसल्यास अशाप्रकारच्या बदलांसाठी नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल. बंधनाच्यास्तरात बदल झाला असल्यास आणि नव्या बंधनानुसार बदल प्रस्तावित केले असल्यास किंवा स्तरात बदल झाला नसल्यास परंतु लागू असलेल्या बंधनांमध्ये बदल झाला असल्यास, अशी पूर्वपरवानगी आवश्यक राहील. बंधनांचा कोणताही स्तर कोणत्याही बदलाविना लागू करावयाचा असल्यास संमतीची आवश्यकता नसेल, असेही यात म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने या आदेशाद्वारे प्रत्येक क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या स्तरांची अंमलबजावणी सोमवार, 14 जून 2021 पासून करण्यात यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचा : १३ व १४ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा… मुंबई महापालिका सज्ज)

  • अहमदनगर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2. 63 टक्के – जिल्ह्याचा समावेश हा पहिल्या स्तरात करण्यात आला आहे.
  • अकोला  – पॉझिटिव्ही रेट 5. 37 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • अमरावती जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • औरंगाबाद जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 5.35 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • बीड जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 5.22 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • भंडारा जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 1.22 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • बुलढाणा जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2.37 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • चंद्रपूर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट ०. 87 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • धुळे जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 1.64 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • गडचिरोली जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 5.55 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • गोंदिया जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 0.83 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • हिंगोली जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 1.20 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • जळगाव जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 1.82 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • जालना जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 1.44 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • कोल्हापूर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 15.85 टक्के – जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • लातूर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2.43 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हे – पॉझिटिव्ही रेट 4.40 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • नागपूर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • नांदेड जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 1.19 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • नंदुरबार जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2. 06 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • नाशिक जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 7.12 टक्के – जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • उस्मानाबाद जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 5.16 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • पालघर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 4.43 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • परभणी जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2.30 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • पुणे जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 11.11 टक्के – जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • रायगड जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 13.33 टक्के – जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • रत्नागिरी जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 14.12 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • सांगली जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 6.89 टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • सातारा जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 11.30 टक्के – जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 11.89 टक्के – जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • सोलापूर जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 3.43 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • ठाणे जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 5. 92टक्के – जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • वर्धा जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2. 05 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • वाशिम जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2.25 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
  • यवतमाळ जिल्हा – पॉझिटिव्ही रेट 2. 91 टक्के – जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.

(हेही वाचा : मुंबईत नाले, गटारांत कचरा टाकणा-यांवर आता कडक कारवाई)

पाच लेव्हल कशा आहेत?

  • पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
  • दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
  • तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील.
  • चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.
  • पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.