बांगलादेशच्या PM Sheikh Hasina यांचा नोकर २८४ कोटींचा मालक; चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

180
बांगलादेशच्या PM Sheikh Hasina यांचा नोकर २८४ कोटींचा मालक; चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशच्या PM Sheikh Hasina यांचा नोकर २८४ कोटींचा मालक; चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांच्या नोकराकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे खासगी हेलिकॉप्टर आहे आणि ते कुठेही प्रवास करण्यासाठी तो वापरतो. ढाका ट्रिब्यूननुसार या नोकराचे नाव जहांगीर आलम होते. तो पंतप्रधान हसिना यांच्या घरी पाहुण्यांना पाणी द्यायचे काम करायचा. जहांगीरने हसीनांच्या कार्यालयात आणि घरात काम करत असल्याचे सांगून अनेक लोकांकडून लाच घेतली होती. काम करून देण्याच्या बहाण्याने तो लोकांकडून पैसे उकळायचा. हे प्रकरण समोर आल्यानंतर पंतप्रधान हसिना यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान हसिना सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जहांगीर आधीच अमेरिकेत पळून गेला आहे. बांगलादेशमध्ये माजी लष्करप्रमुख, पोलीस अधिकारी, कर अधिकारी आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधानांच्या नोकराचेही नाव या यादीत आहे. जानेवारीमध्ये पंतप्रधान हसिना चौथ्यांदा सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बांगलादेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने नुकतीच देशाच्या माजी राष्ट्रीय पोलीस प्रमुख बेनझीर अहमद यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे. (PM Sheikh Hasina)

“नोकराकडे एवढा पैसा आहे, तर मालकाकडे किती पैसे ?”

पीएम हसीना म्हणाल्या, “माझ्या घरी काम करणारी व्यक्ती आज करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे. त्याने एवढा पैसा कुठून कमवला? एका सामान्य बांगलादेशी व्यक्तीला एवढी मालमत्ता जमवायला 13 हजार वर्षे लागू शकतात. सरकारने यावर कारवाई करावी.” बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे प्रवक्ते वहिदुझ्झमन म्हणाले की, हसीनांच्या नोकराकडे एवढा पैसा आहे, तर मालकाकडे किती पैसे आहेत याचा अंदाज लावता येणार नाही. त्यानंतरही या सेवकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला नुकतेच नोकरीवरून काढून टाकण्यात आले. (PM Sheikh Hasina)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.