लोकशाहीर Annabhau Sathe यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी

290
लोकशाहीर Annabhau Sathe यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी

अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावात झाला. ते मातंग समाजाचे होते. या समाजाचे लोक जनजागृतीसाठी पारंपरिक लोकवाद्ये वाजवत असत. अण्णाभाऊ साठे यांनी चौथीच्या पुढे शिक्षण घेतले नाही. ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळानंतर त्यांनी १९३१ मध्ये साताऱ्याहून मुंबईत पायी चालत म्हणजेच सहा महिन्यांच्या कालावधीत स्थलांतर केले. (Annabhau Sathe)

मुंबईत साठे यांनी अनेक नोकऱ्या केल्या. अण्णाभाऊ यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पथनाट्य, पटकथा, पोवाडे, प्रवास वर्णन अशा विविध प्रकारचे लिखाण केले आहे. अण्णाभाऊंचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांच्यावर कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता. ते लाल बावटा कलापथकाचे सदस्य होते. मात्र मुंबईत त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अशा महान नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. (Annabhau Sathe)

(हेही वाचा – एमआयएम कोल्हापुरात काढणार मोर्चा; सकल Hindu समाजाने दिला इशारा)

विशेष म्हणजे कोणतेही शिक्षण न घेता त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यात फकिरा ही कादंबरी खूप गाजली. या कादंबरीसाठी त्यांना १९६१ मध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. साठे (Annabhau Sathe) यांच्या लघुकथांचे १५ संग्रह आहेत. त्याचबरोबर त्यांनी नाटक, रशियावर एक प्रवासवर्णन, १२ पटकथा आणि १० बालगीते पोवाडा शैलीत लिहिली आहेत. “मुंबईची फक्कड” आणि “मुंबईचा गिरणी कामगार” ही गीते देखील खूप गाजली. (Annabhau Sathe)

१८ जुलै १९६९ मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा गांधी मेमोरियल युनिव्हर्सिटी साठे यांना यांनी मरणोत्तर डी.लिट पदवी प्रदान केली आहे. १ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय टपाल विभागाने रु.४ चे विशेष टपाल तिकीट काढून त्यांचा सन्मान केला. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ल्यातील उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. (Annabhau Sathe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.