घाटकोपर येथे राहणाऱ्या एका व्यवसायिकाने वांद्रे-वरळी सी लिंक (BWSL) वरून समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे. स्थानिक कोळ्यांनी सायंकाळी व्यावसायिकाचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिला. आर्थिक संकटातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Suicide)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील रहिवासी असलेले भावेश सेठ यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून सी लिंकवरून उडी मारण्याचा विचार करीत असल्याची माहिती दिली होती. वांद्रे-वरळी सी लिंक टोल प्लाझा येथून जाणाऱ्या एका खाजगी वाहनातून प्रवास केल्यानंतर सेठने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टोल प्लाझा पासून काही अंतरावर वाहन सोडले व चालत काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी सी लिंकवर आपल्या मुलाला व्हिडिओ कॉल करून, तो उडी मारणार असल्याची माहिती दिली. (Suicide)
(हेही वाचा – मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, आसाममध्ये ४० टक्के Muslim लोकसंख्या)
मृताच्या मुलाने दुपारी ४.३० वाजता वांद्रे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या दुःखद घटनेची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सी लिंक आणि टोल प्लाझा येथील क्लोज-सर्किट टेलिव्हिजन (CCTV) फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सेठच्या मुलाच्या माहितीची पुष्टी केली, ज्यामध्ये सेठ कारमध्ये बसलेले आणि नंतर सी लिंकवर उतरताना दिसले. वांद्रे पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “मोटर चालकाने सेठला खाली उतरवल्यानंतर, त्याने सी लिंकवरून उडी मारली. भावेश सेठ हे बॉल-बेअरिंग्सच्या व्यापारात होता, त्याला आर्थिक संकट आणि नैराश्याचा सामना करावा लागत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.” (Suicide)
“सेठच्या मुलाने सांगितले की त्याच्या वडिलांच्या वागण्यात कोणताही बदल वाटत नव्हता, ते त्याच्या दक्षिण मुंबई कार्यालयाकडे जाण्यासाठी घरून निघाले होते अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली. वांद्रे पोलिसांनी सेठचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू हाती घेऊन कोळी बांधवांच्या मदतीने सायंकाळी मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आला असून पूर्व तपासणीसाठी भाभा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे, या प्रकरणी वांद्रे पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली असून ते पुढील तपास करत आहेत. (Suicide)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community