Mumbai Rains : मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस; पुढील ३-४ तास महत्त्वाचे

Mumbai Rains : मुंबईत पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम रहाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.

184
Mumbai Rains : मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस; पुढील ३-४ तास महत्त्वाचे
Mumbai Rains : मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस; पुढील ३-४ तास महत्त्वाचे

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास मुंबईत काही ठिकाणी मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मध्य रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3-4 तास पावसाची संततधार कायम रहाणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे.

(हेही वाचा – मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयात Four Wheeler वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरू)

दक्षिण मुंबईत 51.8 मिमी पावसाची नोंद

१८ जुलै रोजीही मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 सेल्सिअस आणि 25 सेल्सिअसच्या आसपास असणार आहे. मुंबईत पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम रहाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं सखल भागात पाणी साचत आहे. सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 51.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात पावसाची स्थिती काय ?

१८ जुलै रोजी राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तिथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.