- ऋजुता लुकतुके
श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार धम्मिका निरोशनाचा त्याच्या राहत्या घरी आणि पत्नी, मुलांसमोर गोळ्या झाडून खून झाला आहे. या प्रकरणामुळे श्रीलंकेत खळबळ उडाली आहे. १२ बोअरच्या रायफलने ही हत्या झाली आहे. निरोशना तेव्हा आपली पत्नी आणि २ मुलांबरोबरच होता. (Death of a Cricketer)
(हेही वाचा- भर पावसाळ्यातही Melghat च्या ९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा)
या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. पण, अजून काही धागेदोरे त्यांना मिळालेले नाहीत. धम्मिका निरोशना (Dhammika Niroshan) २००२ मध्ये १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार होता. आणि खेळत असताना त्याला देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मानलं जायचं. अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews), उपुल थरंगा (Upul Tharanga) आणि चंडिमल (Chandimal) हे तीनही खेळाडू त्याच्याच कप्तानीखाली तयार झाले होते. निरोशना तेज गोलंदाज होता. उजव्या हाताने फलंदाजीही करायचा. (Death of a Cricketer)
२००० ते २००२ अशी दोन वर्षं तो या वयोगटात खेळला. पण, नंतर विसाव्या वर्षीच अचानक त्याने क्रिकेट सोडून दिलं. २००२ च्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक स्पर्धेत निरोशना लंकन संघातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने १९ धावांच्या सरासरीने ५ सामन्यांत ७ बळी मिळवले होते. (Death of a Cricketer)
(हेही वाचा- ‘Metro 3’चे लोकार्पण २४ जुलै रोजी होणार ? ; विनोद तावडेंनी ट्वीट केले, मग हटवले)
श्रीलंकेसाठी तो १२ प्रथमश्रेणी सामनेही खेळला. तेज गोलंदाज म्हणून नावारुपाला येत असतानाच त्याने क्रिकेट सोडलं. (Death of a Cricketer)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community