वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी Pooja Khedkar यांच्या आईला रायगडमधून अटक

354
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी Pooja Khedkar यांच्या आईला रायगडमधून अटक
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी Pooja Khedkar यांच्या आईला रायगडमधून अटक

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) वादात अडकल्यानंतर त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मुळशी तालुक्यातील पौड येथे हा प्रकार झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. १८ जुलै रोजी अखेर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती लॉज येथून त्यांना साडे पाच वाजता ताब्यात घेण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

(हेही वाचा – Death of a Cricketer : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशनाची पत्नी, मुलांसमोर हत्या)

मनोरमा खेडकर यांची पोलिसांवरही अरेरावी

मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत होती. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील हिरकरणवाडीमधील पार्वती लॉजमध्ये त्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. तिथून त्यांना पुण्यात नेण्यात येत आहे. रायगड पोलिसांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. दरम्यान पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर अद्यापही फरार आहेत.

या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसले. शिवाय या वेळी मनोरमा (Manorama Khedkar)यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. त्यांच्या आयएएस मुलीचे वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईच्या व्हिडिओमुळे आणखी टीका होऊ लागली होती.

पूजा खेडकर यांनी अंबर दिवा लावलेली ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या पुण्यातील घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा खेडकर या अरेरावीने बोलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर हातात पिस्तुल घेतलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना घडली, तेव्हा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

पती दिलीप खेडकर यांनी केले पत्नीच्या वागण्याचे समर्थन

याविषयी पती दिलीप खेडकर म्हणाले, “माझी पत्नी मनोरमा आमच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता तिथे आठ-दहा लोकांनी पत्नीवर हल्ला केला. त्याबाबत एफआयआर दाखल केलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या दोन पिढ्याआधीच ती जमीन विकली गेली असून दोन तीन लोकांकडून ती आमच्यापर्यंत आली. त्यानंतरही हे शेतकरी आम्हाला तिथे जाण्यापासून अडवत आहेत. आम्हाला धमकावत आहेत. मनोरमा खेडकर यानी स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाहेर काढले होते, त्यांनी पिस्तुल कुणावरही रोखून धरलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात जरी गुन्हा दाखल केला असेल तरी त्यांना शेतकऱ्यांनी जी माहिती दिली, तीच जबाबात घ्यावी लागली. पण तपासाअंती सत्य समोर येईल. सदर पिस्तुलाचा परवाना मनोरमा यांच्या नावावरच आहे. एकटी महिला दुर्गम भागात असलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी कशी जाईल? यासाठी तिथे अंगरक्षक आणि पिस्तुल घेऊन जावे लागते.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.