रणरागिणी Tararani यांच्यावर इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांचे व्याख्यान

124
रणरागिणी Tararani यांच्यावर इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांचे व्याख्यान

महाराणी ताराराणी (Tararani) ह्या एक अद्भुत स्त्री होत्या. आपल्या भारतातली स्त्री सबला होती, याचे हे उत्तम उदाहरण. भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र आयोजित व जनसेवा केंद्र बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने “रणरागिणी ताराराणी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. (Tararani)

शिवरायांची सून आणि छत्रपती राजारामांची पत्नी असलेल्या ताराराणी आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे मराठ्यांच्या इतिहासात उठून दिसतात. १२ मार्च १७०१ ला पावनगडचा किल्लेदार विठोजी केसरकर यांना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, “या उपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामीची जागा जतन करून करणे.” (Tararani)

(हेही वाचा – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी Pooja Khedkar यांच्या आईला रायगडमधून अटक)

विलक्षण आत्मविश्वासाने भरलेली ही मराठ्यांची राणी, छत्रपती राजारामांनंतर तळपती तलवार घेऊन साऱ्या मराठी सरदारांबरोबर औरंगजेबाच्या समोर शेवटपर्यंत ठाम उभी होती. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ताराराणी (Tararani) यांनी जे कणखर नेतृत्व दिले, त्यामुळे शिवरायांचे राज्य जिंकण्याची औरंग्याची राक्षसी इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. (Tararani)

आता इतिहास कट्ट्यावर “गोष्ट ‘ती’ची मध्ये वीरांगना ताराराणींच्या (Tararani) जीवनाचा पट गप्पांतून उलगडणार आहेत, इतिहास अभ्यासक यशोधन जोशी. हा कार्यक्रम रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे ‘ज्ञानविहार ग्रंथालय’, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुल, सी विंग, तिसरा मजला, सोडावाला लेन, बोरीवली (प.), मुंबई येथे संपन्न होणार आहे. इतिहास अभ्यासक यशोधन जोशी आपल्या प्रगल्भ वाणीने ताराराणींचा इतिहास जिवंत करणार आहेत. हा कार्यक्रम निःशुल्क असून अधिकाधिक इतिहास प्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Tararani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.