Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद; उबाठाचे धाबे दणाणले; अपप्रचार सुरू

245
Ladki Bahin Yojana : १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये अपयश आल्यानंतर महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोरगरीब कुटुंबातील महिलांना महिना १,५०० रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आणि महाविकास आघाडीचे धाबे दणाणले. आता महाविकास आघाडीतील उबाठाने या योजनेची बदनामी करण्यास सुरुवात केली असून योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ladki Bahin Scheme)

योजना अपयशी करण्याचे प्रयत्न

उबाठा नेते आदित्य ठाकरे तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी १,५०० रुपयांऐवजी १०,००० रुपये लाडक्या बहिणींना द्यावेत अशी ओरड सुरू केली असून ‘लाडकी बहीण’ योजना कशी अपयशी होईल, याबाबचा प्रचार सुरू केला आहे. (Ladki Bahin Scheme)

बहिणी आनंदात

महायुती सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिलेला दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणार आहे. ही योजना जाहीर होताच शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी लाडक्या बहीणींच्या आनंदाला पारावार उरला नाही. (Ladki Bahin Scheme)

(हेही वाचा – Mukhyamantri Ladka Bhau Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी स्टायपेंड देण्याच्या योजनेची घोषणा!)

काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांचा पाठिंबा

प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कार्यालयात योजनेबाबत विधारणा होऊ लागली. काही दिवसांतच योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळू लागल. या योजनेला पाठिंबा देत योजनेची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी सत्ताधारीच नाही तर विरोधी पक्षाचे आमदारही सरसावले. पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर तसेच शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरे आयोजित केली. (Ladki Bahin Scheme)

ई-सेवा केंद्रांवर गर्दी

आतापर्यंत या योजनेसाठी लाखों भगिनींनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले. जिल्ह्याजिल्ह्यात कोणत्याही योजनेच्या लाभार्थी नसलेल्या महिला ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करताना दिसत आहेत. त्यामुळे सेतू, ई-सेवा केंद्रांवरही गर्दी होत आहे. काहींनी ऑफलाइन, तर काहींनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करताना महिला-पुरुष वर्गाची धावपळ होताना दिसते आहे. (Ladki Bahin Scheme)

उबाठाकडून अपप्रचार सुरू

अशाप्रकारे अगदी थोड्या कालावधीत अत्यंत लोकप्रिय झाल्याने शिवसेना उबाठाच्या पोटात गोळा आला आणि त्यांनी योजनेत खोडा घालण्यासाठी अपप्रचार मोहिमच सुरू केल्याचे चित्र आहे. “मुख्यमंत्र्यांच्या घरातील लाडकी बहीण-भावाचे घर १,५०० रुपयांत चालू शकते का? त्यामुळे बहीण आणि भावाला १०,००० रुपये द्या,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १५० रुपये देणारीही योजना ठाकरे सरकारने का केली नाही? याबबाबत राऊत यांनी भाष्य केले नाही. (Ladki Bahin Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.