Love Jihad : ऑटो-रिक्षात केला आंतरधर्मीय विवाह; सांगितले मशिदीत झाला; धर्मांतराचे रॅकेट सुरू आहे का? न्यायालयाने दिला आदेश

बनावट विवाहांच्या नावाखाली धर्मांतराचे कोणतेही रॅकेट सुरू आहे का, याचा तपास करण्याचे निर्देश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना दिले आहेत.

263

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुरक्षेची मागणी करणाऱ्या आंतरधर्मीय जोडप्याला (Love Jihad) मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आणि त्यांच्याविरुद्धच चौकशी करण्याचे निर्देश दिले. अशा ‘बनावट विवाहां’च्या नावाखाली कोणते ‘धर्म परिवर्तन रॅकेट’ सुरू आहे का, याचा शोध घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. याचं कारण म्हणजे या जोडप्याचं लग्न मशिदीत नव्हे तर ऑटोरिक्षामध्ये झालं हे खंडपीठाला समजलं. तर जोडप्याने सांगितले होते की, लग्न मशिदीत झाले होते.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संदीप मोदगील यांच्या खंडपीठाने सांगितले की, हा केवळ न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही, तर न्यायालयासमोर खोटी साक्ष देण्याचा गंभीर गुन्हा आहे. लग्नाच्या नावाखाली न्यायालयाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काय प्रकरण आहे?

एका जोडप्याने पळून जाऊन लग्न केले (Love Jihad) आहे. या दोघांनीही न्यायालयासमोर मुलीच्या कुटुंबीयांपासून संरक्षण मिळण्याची मागणी केली. या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांचे वकील हरजिंदर सिंग यांच्या वतीने सांगण्यात आले की, दोघांनी जुलैमध्ये पंजाबमधील नयागाव येथे मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले (Love Jihad) होते. मुलीच्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध हा विवाह झाला, त्यामुळे आता तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या जोडप्याने त्यांच्या वकिलामार्फत लग्नाचे प्रमाणपत्र आणि छायाचित्रेही न्यायालयासमोर सादर केली.

(हेही वाचा फाळणीच्या वेळी मुसलमानांना भारतात राहू देणे, ही सर्वांत मोठी चूक; Giriraj Singh यांचे थेट वक्तव्य)

पंजाब सरकारतर्फे डेप्युटी ॲडव्होकेट जनरल राजीव वर्मा यांनी युक्तिवाद केला. राजीव म्हणाले की, संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मुलीच्या नातेवाइकांची धोक्याबाबत विचारपूस करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र तो दिलेल्या पत्त्यावर नव्हता.

न्यायालयाने काझींनी जारी केलेले विवाह प्रमाणपत्र आणि छायाचित्रेही काळजीपूर्वक पाहिली. यानंतर न्यायालयाने सांगितले की, छायाचित्रे पाहता, हे स्पष्ट होते की हे लग्न कोणत्याही मशिदीत झाले नव्हते. तसेच, प्रमाणपत्रात नमूद केलेले कोणीही साक्षीदार (वकील, साक्षीदार किंवा मंडळीचे सदस्य) उपस्थित नव्हते. शेवटी याचिकाकर्त्यांनीही लग्न सोहळा ऑटोरिक्षामध्ये झाल्याचे मान्य केले. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अशा बनावट विवाहाच्या (Love Jihad) नावाखाली धर्मांतराच्या नावाखाली कोणते रॅकेट चालवले जात आहे का, याचाही सखोल तपास करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे. याचिकाकर्ते आणि मुलीच्या नातेवाइकांना पुढील तारखेला न्यायालयात हजर केले जाईल याची खात्री न्यायालयाने एसएसपींना केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.