विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमणावर सरकारी यंत्रणा कारवाई करत नाही, म्हणून माजी खासदार संभाजी राजे छत्रपती विशाल गडावर (Vishalgad) गेले असता त्याचवेळी दंगल झाली. या दंगलीचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे कोल्हापुरात मोर्चा काढणार होते, तशी घोषणा करताच हिंदुत्वनिष्ठांनी त्याला तीव्र विरोध केला. अखेर या विरोधासमोर नमल्यावर जलील यांनी कोल्हापूर येथे मोर्चा रद्द केला.
दरम्यान कोल्हापूर दौरा रद्द केला असला तरी एमआयएमच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर दुपारी 3 वाजता शुक्रवारी तीव्र निदर्शने करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये आणि गाजपूर गावात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीतील सर्व धर्मांच्या लोकांना निषेध नोंदवण्याचे आवाहन केले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
(हेही वाचा Vishalgad वरील सर्व अतिक्रमणे हटवणार मुख्यमंत्र्यांचे आश्वासन)
पोलिसांनी केली होती विनंती
विशाळगड (Vishalgad) परिसरात घडलेल्या घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेच्या विरोधात एमआयएमच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, काही संघटनांनी या मोर्चाला विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी इम्तियाज जलील यांना कोल्हापूर दौऱ्यावर न येण्याची विनंती केली होती. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी हा दौरा रद्द केला.
Join Our WhatsApp Community