Kho Kho Referee : खो खो खेळाच्या पंचांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर

Kho Kho Referee : खो खो खेळातील बदललेले नियम पंचांना माहीत व्हावेत यासाठी हे शिबीर आहे. 

180
Kho Kho Referee : खो खो खेळाच्या पंचांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर
  • ऋजुता लुकतुके

महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे राज्य खो खो पंच शिबीर येत्या २७ आणि २८ जुलैला हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं होणार आहे. वसमतच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या आवारात हे शिबीर होणार असून हिंगोली जिल्हा ॲमेच्युअर खो खो असोसिएशनच्या वतीने हे शिबीर भरवण्यात येत आहे. खो खो च्या बदलेल्या नियमांवर चर्चा हा या शिबिराचा मुख्य अजेंडा असेल. तसेच या शिबिरात प्रात्यक्षिक सुध्दा घेतले जाणार आहे असे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पंच मंडळ अध्यक्ष सुधाकर राऊळ यांनी सांगितले. (Kho Kho Referee)

खो खो स्पर्धांचा नवा राष्ट्रीय हंगाम सुरू होण्यापूर्वी पंचांना नवीन नियमावली माहीत असावी आणि नवे राष्ट्रीय स्पर्धांचा कार्यक्रम माहीत व्हावा यासाठी अशाप्रकारचे शिबीर आयोजित केलं जातं. (Kho Kho Referee)

(हेही वाचा – UPSC निवड यादीपासून ते IFS बनावट आयडीपर्यंत… कोण आहे IFS Jyoti Mishra?)

या पंच शिबिरामध्ये पूर्णवेळ उपस्थित असलेल्या पंचांनाच राज्य स्पर्धांकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे. संलग्न जिल्ह्यातील राज्य/राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण पंचानी ऑनलाईन नोंदणी २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://forms.gle/1WYQ3Sa122yCstcg7 या लिंकवर करायची आहे. नोंदणी केलेल्या पंचानाच शिबिरात सहभागी होता येईल असे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पंच मंडळ सचिव प्रशांत पाटणकर (काका) व पंच मंडळ सहसचिव नानासाहेब झांबरे यांनी कळविले आहे. (Kho Kho Referee)

अधिक माहितीसाठी नागनाथ गजमल (भ्रमणध्वनी क्र. ९४२१३८१४२०) अथवा अमोल मुटकुळे (भ्रमणध्वनी क्र. ९७६५५२५७२९) यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन महाराष्ट्र खो खो असोसिएशनने केलं आहे. (Kho Kho Referee)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.