Indian Navy कडून ‘THINQ 2024’ राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेची घोषणा

220
Indian Navy कडून 'THINQ 2024' राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेची घोषणा

भारतीय नौदल अतिशय अभिमानाने आपला प्रमुख कार्यक्रम असलेल्या THINQ 2024 या राष्ट्रीय स्तरावरच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नमंजुषेची घोषणा करत आहे. युवा मनांना बौद्धिक खतपाणी, त्यांच्यात आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान आणि देशभक्तीची भावना बिंबवण्यासाठी हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण संधी पुरवतो. यापूर्वी आयोजित THINQ-22 आणि जी-20 THINQ (गेल्या वर्षी आयोजित या स्पर्धेत जी-20 देश सहभागी झाले होते) यांना भरभरून मिळालेल्या यशाने यंदाही हा कार्यक्रम आयोजित करण्यास भारतीय नौदलाला प्रोत्साहन लाभले आहे. (Indian Navy)

यावर्षी या स्पर्धेची संकल्पना ‘विकसित भारत’ अशी असून वर्ष 2047 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारताला विकसित राष्ट्र करण्याच्या भारत सरकारच्या संकल्पाशी अनुरूप आहे.ही स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेण्यापुरती मर्यादित नाही. तर युवा मनांना प्रेरित करण्याचा, राष्ट्र उभारणीत तसेच राष्ट्राचा नावलौकिक अधिक उंचावण्यात आपली भूमिका याविषयी युवा पिढीच्या मनात जागृती निर्माण करण्याचा हा मंच आहे. (Indian Navy)

(हेही वाचा – प्रविण दरेकर यांचा Manoj Jarange Patil यांना इशारा; म्हणाले…)

हजारो युवा मनांना बौद्धिक अनुभव प्रदान करण्याची ग्वाही हा कार्यक्रम देतो. ही स्पर्धा देशभरातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. स्पर्धा हायब्रीड मोडमध्ये आयोजित केली जाईल आणि सहभागींचे सर्वसमावेशक मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी चार टप्प्यात घेतली जाईल. पहिले दोन टप्पे तीन बाद फेऱ्यांसह होतील. त्यानंतर विभागीय निवड फेरी होईल. अव्वल 16 संघ विभागीय निवड फेऱ्यांमध्ये पात्र ठरून उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीतून आठ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे, दक्षिण नौदल कमांड येथे होतील. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शाळांना या स्पर्धेसाठी सुलभ नोंदणी करता यावी आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती पुरवण्यासाठी THINQ 2024 ला समर्पित www.indiannavythinq.in हे संकेतस्थळ 15 जुलै रोजी सुरू करण्यात आले आहे. (Indian Navy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.