मुंबईसह इतर ठिकाणी सध्या पावसाची संततधार सुरु असली तरी प्रत्यक्षात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणक्षेत्रात मागील दोन चार दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला दिसून येत नाही. या सर्व धरणांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली असली आहे. पण, धरणातील पाणीसाठा मात्र त्याप्रमाणात वाढलेला दिसून येत नसल्याने एकप्रकारे मुंबईकरांपुढे मोठी चिंता उभी राहिली आहे. (Mumbai Rain)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी धरण तथा तलावातून मुंबईला ३९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असून सध्या यासर्व धरणांमध्ये एकूण ३८.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३५.७० टक्के एवढा पाणीसाठा होता, तर सन १८ जुलै २०२२ पर्यंत ८४.४१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला होता. (Mumbai Rain)
विशेष म्हणजे यासर्व धरणांमध्ये सध्या दिवसाला सरासरी २० ते २५ मि. मी एवढा पाऊस पडत असून बुधवारीही या सर्व धरण तथा तलावांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. मुंबईत पावसाची नोंद आतापर्यंत अधिक झाल्याने तुळशी आणि विहार तलावाची पातळी झपाट्याने वाढताना दिसत असली तरी अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आदी धरणक्षेत्रात अजूनही समाधानकारक मागील वर्षीच्या तुलनेत झाल्याचे दिसून येत नाही. (Mumbai Rain)
(हेही वाचा – राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार; पर्यटनमंत्री Girish Mahajan यांचा दावा)
१८ जुलैपर्यंत सर्व धरण, तलावांमधील एकूण पाऊस आणि पाणीसाठा
अप्पर वैतरणा धरण
सन २०२४ : एकूण पाऊस : ७३० मिमी (पाणीसाठा : १९,१४० दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : ८८६ मिमी (पाणीसाठा : २६,३७३ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस: १२५५ मिमी (पाणीसाठा : १,६४,२४९ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
मोडक सागर धरण
सन २०२४ : एकूण पाऊस : १०९९ मिमी (पाणीसाठा : ७४,२७४ दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : १३६८ मिमी (पाणीसाठा : ७५,८२८ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस: १७३९ मिमी (पाणीसाठा : १,२८, ९२५ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
तानसा तलाव
सन २०२४ : एकूण पाऊस : ११९२ मिमी (पाणीसाठा : १,०६,६१९ दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : १०९९ मिमी (पाणीसाठा : ९५,६०३ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस: १७७८ मिमी ( पाणीसाठा : १,४४,००५ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
मध्य वैतरणा धरण
सन २०२४ : एकूण पाऊस : १०९७ मिमी (पाणीसाठा : ६८,११२ दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : ९७० मिमी (पाणीसाठा : ९३,८०३ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस : १६२२ मिमी (पाणीसाठा : १,७५,३६२ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
भातसा धरण
सन २०२४ : एकूण पाऊस : १२७६ मिमी (पाणीसाठा : २,६५,८६३ दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : १०१७ मिमी (पाणीसाठा : २,०४,९२१ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस : १८६८ मिमी (पाणीसाठा : ५,८२,२५९ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
विहार तलाव
सन २०२४ : एकूण पाऊस : १५८६ मिमी (पाणीसाठा : १५,८९४ दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : ११८१ मिमी (पाणीसाठा : १४,१४६ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस : १७४३ मिमी (पाणीसाठा : १८,९३७ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
तुळशी तलाव
सन २०२४ : एकूण पाऊस : १८१२ मिमी (पाणीसाठा : ६,८८० दक्षलक्ष लिटर)
सन २०२३ : एकूण पाऊस : १५७७ मिमी (पाणीसाठा : ६,२२६ दक्षलक्ष लिटर)
सन २०२२ : एकूण पाऊस : २५५० मिमी (पाणीसाठा : ८,०४६ दक्षलक्ष लिटर) (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community