- ऋजुता लुकतुके
भारताच्या छोटेखानी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड अखेर करण्यात आली आहे. टी-२० मालिकेसाठी सध्या चर्चा सुरू होती त्याप्रमाणे सूर्यकुमार यादव कर्णधार आहे. तर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. दोन्ही प्रकारात शुभमन गिल भारतीय संघाचा उपकर्णधार असणार आहे. झिंबाब्वे दौऱ्यातील रियान परागला टी-२० संघात स्थान मिळालंय. तर शतक झळकावणारा अभिषेक शर्मा संघात नाहीए. महत्त्वाचं म्हणजे हार्दिक पांड्या टी-२० मालिकाही खेळणार आहे. (India Tour of Sri Lanka)
मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमराला दोन्ही मालिकांमधून विश्रांती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. (India Tour of Sri Lanka)
(हेही वाचा – राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार; पर्यटनमंत्री Girish Mahajan यांचा दावा)
बुमराच्या अनुपस्थितीत अर्शदीप, मोहम्मद सिराज आणि खलिल अहमद तेज गोलंदाजीची धुरा वाहणार आहेत. तर एकदिवसीय संघात निवड झालेला हर्षित राणा हा एकमेव नवीन चेहरा असेल. ‘खेळाडूंची तंदुरुस्ती आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचं प्रमाण यावर बीसीसीआयचं लक्ष असेल,’ असं सचिव जय शाह यांनी संघ जाहीर करताना काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. श्रीलंकेचा दौरा २७ जुलैला पलिक्कल इथं होणाऱ्या टी-२० सामन्याने सुरू होईल. (India Tour of Sri Lanka)
भारताचा टी-२० संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज व खलिल अहमद. (India Tour of Sri Lanka)
भारताचा एकदिवसीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद व हर्षित राणा. (India Tour of Sri Lanka)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community