खगोलभौतिकशास्त्रज्ञ Jayant Narlikar यांचा जन्मदिन; जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल

364
खगोलभौतिकशास्त्रज्ञ Jayant Narlikar यांचा जन्मदिन; जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल

जयंत विष्णू नारळीकर हे एक भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ऍस्ट्रोनॉमी अँड ऍस्ट्रॉफिजिक्स म्हणजेच IUCAA येथे एमिरीटस प्रोफेसर आहेत. त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत कॉन्फॉर्मल ग्रॅव्हिटीचा सिद्धांत विकसित केला. त्या सिद्धांताला हॉयल-नारळीकर सिद्धांत म्हणून ओळखला जातो. हा सिद्धांत अल्बर्ट आइनस्टाईनचा सापेक्षता सिद्धांत आणि मॅकच्या तत्त्वाचं संश्लेषण करतो. (Jayant Narlikar)

जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ साली महाराष्ट्रातल्या कोल्हापूर येथे एका विद्वान कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विष्णू वासुदेव नारळीकर असं होतं. ते एक गणितज्ञ आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. ज्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथे गणित विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून काम केलं होतं. त्यांच्या आईचं नाव सुमती नारळीकर असं होतं. त्या संस्कृत भाषेच्या विद्वान होत्या. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर या गणितज्ज्ञ होत्या. त्यांना तीन मुली आहेत. त्यांचे मामा व्ही. एस. हुजूरबाजार हे एक प्रतिष्ठित सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. (Jayant Narlikar)

(हेही वाचा – Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आली ही अत्यंत अभिमानास्पद बाब – गोविंद शेंडे)

जयंत नारळीकर यांनी त्यांचं शिक्षण सेंट्रल हिंदू कॉलेज इथून पूर्ण केलं. सध्या हे कॉलेज सेंट्रल हिंदू बॉईज स्कुल म्हणून ओळखलं जातं. १९५७ साली त्यांजी बनारस हिंदू विद्यापीठातून बीएससी ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये फिट्झविल्यम नावाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्या कॉलेजातून १९५९ साली त्यांनी गणित या विषयात BA Tripos ही पदवी मिळवली. ते तिथले वरिष्ठ रँग्लर होते. (Jayant Narlikar)

१९६० साली जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्र या विषयामध्ये टायसन पदक जिंकलं होतं. १९६२ साली कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी येथे डॉक्टरेटचा अभ्यास करत असताना त्यांनी स्मिथ पारितोषिक जिंकलं होतं. १९६३ साली जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनानंतर्गत पीएचडी ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधल्या किंग्स कॉलेजमध्ये बेरी रॅमसे फेलो म्हणून काम केलं. ते काम करत असतानाच त्यांनी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र हा विषयांमध्ये आपलं पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी किंग्ज कॉलेजमध्ये १९६४ ते १९७२ सालापर्यंत पर्यंत फेलो म्हणून काम केलं. १९६६ साली फ्रेड हॉयल यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ थ्योरेटिकल ॲस्ट्रॉनॉमीची स्थापना केली. त्यासोबतच जयंत नारळीकर यांनी १९६६ ते १९७२ सालादरम्यान संस्थेचे संस्थापक कर्मचारी सदस्य म्हणून काम केलं. (Jayant Narlikar)

(हेही वाचा – Jammu Kashmir Encounter: कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी चकमकीत ठार)

१९७२ साली नारळीकर (Jayant Narlikar) यांनी मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR येथे प्राध्यापकपद स्वीकारलं. TIFR मध्ये ते सैद्धांतिक खगोल भौतिकशास्त्र गटाचे प्रभारी होते. १९८८ साली भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने पुण्यामध्ये इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच IUCAA ची स्थापना केली. त्यावेळी जयंत नारळीकर हे IUCAA चे संस्थापक-संचालक बनले. (Jayant Narlikar)

१९८१ साली जयंत नारळीकर (Jayant Narlikar) हे जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य बनले. नारळीकर हे कॉस्मॉलॉजीमधील त्यांच्या अद्वितीय कामासाठी ओळखले जातात. पुढे १९९४-१९९७ सालादरम्यान ते इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या कॉस्मॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या संशोधन कार्यामध्ये मॅकचे तत्त्व, क्वांटम कॉस्मॉलॉजी आणि ॲक्शन-एट-अ-डिस्टन्स भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. एनसीईआरटी म्हणजेच नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या विज्ञान आणि गणितातील पाठ्यपुस्तके विकसित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पाठ्यपुस्तक विकास समिती विज्ञान आणि गणितातल्या पाठ्यपुस्तकांसाठी सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. (Jayant Narlikar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.