ठाण्यासह कोकणात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवारी ठाणे, पालघरसह रायगड, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, तर रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना ‘Red Alert’ जारी करण्यात आला आहे. (Orange Alert)
गेल्या मंगळवारी मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र त्या काळात पावसाने मुंबईकडे पाठ फिरविल्याने हवामान खात्याचे अंदाज पूर्णपणे फोल ठरले होते. त्यामुळे हवामान खात्याच्या अलर्टनुसार शुक्रवारी पाऊस पडणार का असा प्रश्न आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region) पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली असून, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहील. (Orange Alert)
(हेही वाचा- Gadchiroli Naxalism: सी-६० कामांडोंचं अतुलनीय कार्य; उत्तर गडचिरोली ३५ वर्षांनंतर नक्षलवाद मुक्त )
- ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
शुक्रवार – ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा, नागपूर
शनिवार- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
रविवार – रायगड आणि सिंधुदुर्ग
हेही पहा-
Join Our WhatsApp Community