Wagh Nakh: प्रतीक्षा संपली… शिवकालीन वाघनखं साताऱ्याच्या वस्तु संग्रहालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा

237
Wagh Nakh: प्रतीक्षा संपली… शिवकालीन वाघनखं साताऱ्याच्या वस्तु संग्रहालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा
Wagh Nakh: प्रतीक्षा संपली… शिवकालीन वाघनखं साताऱ्याच्या वस्तु संग्रहालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त गेल्या वर्षभर उत्सुकता लागून राहिलेल्या वाघनखे मोठ्या कडक बंदोबस्तात अत्यंत गुप्तता पाळत बुधवारी सायंकाळी मुंबईहून साताऱ्यात आणण्यात आली. हे वाघनखे (Wagh Nakh) आणताना पुरेपूर गुप्तता पाळण्यात आली होती. वाघनखे श्री छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shiv Chhatrapati Shivaji Maharaj) वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे शिवभक्तांना दर्शनासाठी शुक्रवार, दि. १९ जुलै दिमाखदार सोहळ्यानंतर २० जुलै पासून उपलब्ध होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा (Satara) जिल्हा सज्ज आहे. (Wagh Nakh)

छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धकाळात वापरलेले वाघनखे ही साताऱ्यात अत्यंत गुप्तता पाळत पोलीस बंदोबस्तात दि. १७ जुलै रोजी आणण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. यात जिल्हास्तरावर महानाट्याचे आयोजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्याशी निगडित घटना, स्थळे व महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित १३ विशेष टपाल तिकिटांचे व टपाल आवरणाचे अनावरण करण्यात येणार आहे. सात महिने ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.  

(हेही वाचा – Legislative Assembly Polls : शिवसेनेकडून विधानसभेसाठी १०० जागांची मागणी; मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली बैठक

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रप्रदर्शन उद्घाटन होणार आहे.  (Wagh Nakh)

असा असेल कार्यक्रम  

– सातारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ११  वाजता मुख्य सोहळा सुरु होईल.

– कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘गडगर्जना’ या तासभर चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असेल

– मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर हे दुपारी १२:३० वाजता राज्य वस्तू संग्रहालय येथे पोहोचतील.

– दुपारी १२:३५ वाजता वाघनखांसमोरील पडदा बाजुला सारून वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल.

– हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सर्व मान्यवर दुपारी १ वाजता पुन्हा वस्तुसंग्रहालयातून जिल्हा परिषद सभागृहात परततील.

– दुपारी ०१ ते ०२:१५ वाजेपर्यंत सर्व मान्यवरांचे स्वागत-सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन होईल

– याशिवाय लंडनहून वाघनखं घेऊन आलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती असेल.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.