- ऋजुता लुकतुके
२००८ मध्ये सुशील कुमारने मिळवलेलं कांस्य पदक हे भारतीय कुस्तीसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. त्यानंतर २०१२ मध्ये सुशील कुमारने रौप्य जिंकलं तर योगेश्वर दत्तने कांस्य जिकलं. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य पटकावलं. आणि टोकयो ऑलिम्पिकमध्ये रवी दाहिया आणि बजरंग पुनिया या दोघांनी डबल धमाका उडवून दिला. अशाप्रकारे भारताने कुस्ती प्रकारात आतापर्यंत सात वैयक्तिक पदकं जिंकली आहेत. २००८ पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळालं आहे. (Paris Olympic 2024)
२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकडे पडघम आता वाजले आहेत. यावेळीही कुस्ती भारताचा प्रमुख खेळ असला तरी पार्श्वभूमी आहे ती कुस्तीपटूंनी देशात केलेल्या आंदोलनाची. त्याचा परिणाम खेळाडूंच्या सरावावर नक्की झाला आहे. कुस्तीतील सावळ्या गोंधळामुळे राष्ट्रीय शिबिरं आणि निवड चाचणी स्पर्धाही रद्द कराव्या लागल्या आहेत. (Paris Olympic 2024)
अखेर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे फक्त ६ मल्ल पात्र ठरले आहेत. यात एक पुरुष आणि ५ महिला आहेत. त्यांची बलस्थानं आणि कच्चे दुवे पाहूया, (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – राज्य सरकारला मोठा दणका; RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द)
अमन शेरावत – अननचा गेल्या काही वर्षातील खेळ आणि त्याने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. त्याने गेल्यावेळचा रौप्य पदक विजेता रवी दाहियाला मागच्या दोन वर्षांत मागे टाकलं आहे. दाहियाला हरवून ५७ किलो वजनी गटात ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे. अमन रणनीती आखण्यात थोडा कमी पडतो. पण, त्याच्याकडे जबरदस्त चिकाटी आणि चपळता आहे. डाव सहा मिनिटं चालला तर त्याला हरवू शकतील असे फार कमी मल्ल आहेत. (Paris Olympic 2024)
विनेश फोगाट – विनेश फोगाट २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे मागे पडली. नाहीतर तेव्हाच तिचं पदक नक्की होतं. यंदाही जिगर दाखवत तिने शेवटच्या क्षणी पात्रता मिळवली आहे. पण, तिची मागची जवळ जवळ दोन वर्षं ब्रिजभूषण शरण यांना विरोध करणाऱ्या आंदोलनात गेली आहेत. डावपेच आणि बचाव या दोन्हीत ती माहीर आहे. पण, मागची दोन वर्षं ती फारशी खेळलेली नाही. ५० किलो गटात ती उतरणार आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू बॉलिवूड स्टारपेक्षाही जास्त; रणवीर, शाहरुखला टाकलं मागे)
अंतिम पनघल – हिस्सारची ही कुस्तीपटू खेळाडूंचं आंदोलन ऐन भरात असताना कुस्तीवर लक्ष केंद्रीत करून होती. त्यामुळेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती पहिली कुस्तीपटू ठरली. ५३ किलो गटात ती खेळणार आहे. चपळ हालचाली हे तिचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. ती प्रतिस्पर्ध्याच्या पकडीतून सहीसलामत बाहेर पडू शकते. नुकतीच ती पाठदुखीमुळे हैराण होती. ही दुखापत तिच्यासाठी किती आव्हानात्मक ठरते ते आता पाहावं लागेल. (Paris Olympic 2024)
अंशू मलिक – अंशू मलिक टोकयो ऑलिम्पिक खेळली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचा चांगला अनुभव तिच्याकडे आहे. तेव्हा जेमतेम १८ वर्षांची अंशू आता थोडी परिपक्व झाली आहे. पण, तरीही तिच्या खेळातील अंगभूत चढ उतार तिला कोंडीत पकडतात. तिच्या दिवशी ती मैदान नक्कीच मारू शकते. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – Microsoft Windows Crash : मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरातील विमान उड्डाणवर परिणाम)
निशा दाहिया – २०२१ पासून निशा दाहिया फॉर्मात आहे. ती कधी मागून येऊन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली याचा कुणाला अंदाजच आला नाही. लढवय्यी कुस्तीपटू असलेली निशा कुणाला हार मानत नाही. तिच्याकडे पुरेपूर कौशल्य आहे. पण, दुखापतींमुळे ती सातत्यपूर्ण खेळ करू शकलेली नाही. तसंच मोठ्या स्पर्धांमध्ये ती फारशी खेळलेली नाही. ५७ किलो गटात ती भारतीय आव्हान उभं करेल. (Paris Olympic 2024)
रितिका हूडा – रितिका ७६ किलो वजनी गटात खेळते आणि या गटाला हवी तशीच तिची शरीरयष्टी आहे. तिच्या हालचालींनी कुस्तीच्या मॅटवर ती दहशत निर्माण करते. तांत्रिकदृष्ट्या ती सरस आहे. आणि बचावही भक्कम आहे. पण, शेवटच्या ३० सेकंदांत ती नाहक गुण घालवते. त्यामुळेच मोठ्या स्पर्धांमध्ये तिला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community