मध्य रेल्वे कर्नाक बंदर ब्रीजचे गर्डर लाँचिंग ब्लॉकच्या कामासाठी विशेष पोर्टल बूमच्या उभारणीसाठी आणि ८०० एमटी एअरड्रॉप रोड क्रेनद्वारे जुने अँकर हटवण्याच्या कामासाठी ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) द्वारे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे. (Block)
चालवल्या जाणाऱ्या ब्लॉक्सचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
ब्लॉक दिनांक : २०/२१.०७.२४ (शनिवार/रविवार रात्री)
ब्लॉक कालावधी : मध्यरात्री ००.३० पासून ते ०४.३० वाजेपर्यंत (०४:०० तास)
ट्रॅफिक ब्लॉक विभाग :
भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गिका आणि अप आणि डाऊन जलद मार्ग (सातव्या मार्गासह आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेकसह) तसेच वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर लाईन्स (७वी लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेक-२ सह) रेल्वे वाहतुकीवर परिणाम. (Block)
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या खालील प्रमाणे चालवल्या जातील :
- ब्लॉक कालावधीत मेन लाईनवर भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच हार्बर लाईनवर वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
- मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील.
- हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत/पासून शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या केल्या जातील. (Block)
(हेही वाचा – Microsoft Windows Crash : मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरातील विमान उड्डाणवर परिणाम)
मुख्य मार्गिका :
- डाऊन स्लो लाईन N१ शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१४ वाजता सुटेल आणि कसारा येथे ०३:०० वाजता पोहचेल.
- अप स्लो लाईन S५२ शेवटची लोकल कल्याण येथून २२:३४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ००:०६ वाजता पोहचेल.
- डाउन जलद लाईन S३ पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४:४७ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०६:०७ वाजता पोहचेल.
- अप धीमी लाईन T२ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ठाणे येथून पहिली लोकल ०४:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४:५६ वाजता पोहचेल. (Block)
हार्बर मार्गावर :
- डाउन हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून शेवटची लोकल PL१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०१:३३ वाजता पोहचेल.
- शेवटची लोकल PL १९४ पनवेल अप हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी २२:४६ वाजता सुटेल आणि ००:०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.
- डाउन हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल PL९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४:५२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ६:१२ वाजता पोहचेल.
- अप हार्बर लाईन B२ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पहिली वांद्रे लोकल ०४:१७ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४:४८ पोहचेल. (Block)
मेल/एक्स्प्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट
खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर स्टेशन येथे स्थगित केल्या जातील :
12870 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस
11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
12052 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस
22120 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस
11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. (Block)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community