लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, 21 जुलै 2024 रोजी लोकमान्य टिळक जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये ‘लोकमान्य टिळकांचा राष्ट्रवाद’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते मोहन शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि टिळक चरित्रकार अरविंद गोखले यांना या वर्षीच्या ‘लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कारा’ने (Lokmanya Tilak) सन्मानित करण्यात येणार आहे. (Lokmanya Smruti Pratishthan)
(हेही वाचा – दूधाला हमीभाव देण्यासाठी मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांची केंद्राकडे मागणी)
हा कार्यक्रम 21 जुलै रोजी पुण्यातील केसरीवाडा येथे लोकमान्य सभागृहात सायंकाळी ५.३० ते ८ या कालावधीत होणार आहे.
कार्यक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संचालक अविनाश धर्माधिकारी असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे लोकमान्य स्मृती प्रतिष्ठान वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. (Lokmanya Smruti Pratishthan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community