WazirX Halts : वझीर एक्स क्रिप्टो एक्सचेंज काही काळ का बंद झालं होतं?

WazirX Halts : वझीर एक्समधून २३० दशलक्ष अमेरिकन डॉलरची टोकन चोरीला गेली आहेत. 

199
WazirX Halts : वझीर एक्स क्रिप्टो एक्सचेंज काही काळ का बंद झालं होतं?
  • ऋजुता लुकतुके

देशातील आघाडीचं क्रिप्टो एक्सचेंज असलेल्या वझीर एक्सने गुरुवारी एक धक्कादायक गोष्ट उघड केली आहे. एक्सचेंजवर सायबर हल्ला झाला असून सुरक्षा यंत्रणा हॅक करत चोरट्यांनी २३० दशलक्ष किमतीची टोकन चोरली आहेत. या बातमीनंतर वझीर एक्सने ताबडतोब करायचा उपाय म्हणून काही काळ रुपये आणि डॉलरमधून पैसे काढून घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे. (WazirX Halts)

म्हणजे तुमचे एक्सचेंजमधील पैसे तुम्हाला काढून घेता येणार नाहीत. ‘आमच्या एका वॉलेटवर सायबर हल्ला झाला आहे. आमची सुरक्षा भेदून वॉलेट हॅक झालं आहे. आम्ही तातडीने या बाबतीत तपास करत आहोत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही रुपये आणि डॉलरमध्ये पैसे काढण्याची सुविधा तात्पुरती स्थगित केली आहे,’ असं वझीर एक्सने कळवलं आहे. (WazirX Halts)

(हेही वाचा – Lakhbir Singh Sandhu News : खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधूच्या मुख्य साहाय्यकाला अटक)

काही वेळानंतर वझीर एक्सने आपला एक ब्लॉग अपडेट करत ते करत असलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. ‘काही वॉलेट्स जिथून पैसे काढून घेतले गेले, त्यांचा शोध आम्ही लावला आहे. वॉलेटशी संपर्क करून त्यांच्याकडून पैसे परत मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत,’ असं कंपनीने कळवलं आहे. (WazirX Halts)

लुकऑनचेन या थर्ड पार्टी ब्लॉकचेन ॲपने दिलेल्या माहितीनुसार, वझीर एक्सने शिबा इनू, इथेरियम, मॅटिक, पेपे कॉईन, टिथर आणि गाला ही टोकन गमावली आहेत. फेब्रुवारी २०२३ पासून कार्यरत असलेलं वॉलेट चोरांनी फोडलं आहे. (WazirX Halts)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.