- ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या नदालने आपण अजून संपलेलो नाही असा इशाराच बस्ताद ओपन स्पर्धेत दिला आहे. कॅमेरॉन नुरीला ६-४, ६-४ असं सरळ सेटमध्ये हरवत त्याने स्पर्धेची उपउपांत्य फेरी गाठली आहे. ३८ वर्षीय नदाल दुखापतीतून सावरल्यानंतर यावर्षी खेळण्याचा अटोकाट प्रयत्न करतोय. पण, मागच्या १६ सामन्यांमध्ये तो पहिल्यांदाच सलग दोन सामने जिंकला आहे. बस्तादमध्ये मात्र त्याचा क्ले कोर्टवर नेहमी दिसणारा खेळ दिसून आला. (Rafael Nadal)
तो आक्रमक होता आणि दोन्ही बाजूने फटके खेळत होता. ‘आता जरा बरं वाटतंय. एकतर फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीत हरलो असलो तरी तेव्हापासून सातत्याने खेळतोय आणि कोर्टवर बराच वेळ घालवू शकतोय. नूरी सारख्या कसलेल्या खेळाडूबरोबर खेळण्याची मजाही काही और होती. त्यामुळे माझी तयारी चांगली होत आहे,’ असं नदाल सामन्यानंतर एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. (Rafael Nadal)
Rafael Nadal ousts Cameron Norrie in two sets at Bastad!#NordeaOpen pic.twitter.com/d1sExqvkrX
— Roland-Garros (@rolandgarros) July 18, 2024
(हेही वाचा – Budget : पंतप्रधान आवास योजनेची उत्पन्न मर्यादा कमी होण्याची शक्यता)
कॅमेरुन नुरी एकेकाळी क्रमवारीत आठव्या स्थानावर होता. आताही त्याने नदालला चांगली लढत दिली. पहिल्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी असताना नदालने एक फोरहँड विनर फटका खेळला. तिथून या सेटवर कब्जा करायला सुरुवात केली. नदालला एकदा संधी मिळाली तर तो मागे वळून पाहत नाही. तेच त्याने ३८ व्या वर्षीही दाखवून दिलं. (Rafael Nadal)
पहिला सेट त्याने ६-४ असा जिंकला आणि दुसऱ्या सेटमध्ये पहिला गेम गमावल्यामुळे तो मागे पडला होता. १-४ अशी पिछाडी त्याच्याकडे होती. पण, यावेळी नदालने आपला सर्वोत्तम खेळ पेश केला. उर्वरित पाच गेम जिंकून त्याने सामना दोन सेटमध्ये जिंकला. क्ले कोर्टवरील आपलं वर्चस्व नदालने पुन्हा एकदा दाखवून दिलं. (Rafael Nadal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community