शिवसेना आमदार Dilip Lande यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीवर टाकला बहिष्कार

143
शिवसेना आमदार Dilip Lande यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीवर टाकला बहिष्कार

शिवसेना चांदिवली आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी शुक्रवारी (१९ जुलै) जिल्हा नियोजन समिती मुंबई उपनगर बैठकीत सभात्याग करीत बहिष्कार टाकला. आमदार दिलीप लांडे हे गेले ४ वर्षांपासून चांदिवली विधानसभा क्षेत्रातील विविध लोकोपयोगी सुविधा पुरविण्यासाठी शासकीय मोकळ्या भूखंडावर शासकीय नामफलक आणि भूखंडाच्या सभोवताली कुंपण भिंत घालण्यासाठी अनेकवेळा प्रश्न उपस्थीत करून सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत होते. (Dilip Lande)

परंतु जिल्हा नियोजन समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि आजपर्यंत एकाही ठिकाणी शासकीय नामफलक व कुंपण भिंत घालण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून सदर शासकीय भूखंडावर अतिक्रमण होण्यासाठी संबंधित अधिकारी मदत करत आहेत आणि पुन्हा सदर अतिक्रमण हटविण्यासाठी एस. आर. ए. योजना राबवून विकासकाला मदत करतात. शासनाचा भूखंड अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारी झोपडपट्टीदादा आणि विकासकांच्या आर्थिक संगनमताने गिळण्याचा प्रयत्न करीत असतात याच्या आमदार दिलीप लांडे यांनी जाहीर निषेध व्यक्त करीत सभात्याग करीत बैठकीवर बहिष्कार टाकला. (Dilip Lande)

(हेही पहा – विरोधकांच्या ‘फेक नेरेटिव्ह’ ला Shiv Sena च्या रणरागिणी देणार प्रत्युत्तर)

शासकीय नागरी सुविधेचा आरक्षित भूखंडावर नामफलक लावण्यासाठी निधी उपलब्द नसेल आणि फक्त कागदोपत्री निधी दाखवला जात असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना बैठकीच्या वेळी काजू-बदाम अल्पोहारासाठी निधी कसा काय उपलब्ध होतो असा प्रश्न उपस्थित करीत आमदार दिलीप लांडे यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये निधीचे नियोजन केलेले कागदपत्र फाडून जाहीर निषेध करीत सभात्याग केला. (Dilip Lande)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.