PM Narendra Modi यांनी मन की बात कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना

173
PM Narendra Modi यांनी मन की बात कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. अनेक तरुण विशेषतः समाज परिवर्तनाच्या उद्देशाने सामूहिक प्रयत्नांना ठळकपणे अधोरेखित करतात हे पाहून पंतप्रधानांनी आनंदही व्यक्त केला आहे. (PM Narendra Modi)

ज्यांनी अद्याप MyGov किंवा NaMo ॲपवर आपल्या सूचना सामायिक केलेल्या नाहीत त्यांनी या व्यासपीठावर सामायिक करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Rafael Nadal : राफेल नदाल बस्ताद ओपन स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत)

X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, “मला या महिन्याच्या रविवार, २८ तारखेला होणाऱ्या #MannKiBaat साठी असंख्य सुचना मिळत आहेत. विशेषत: आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सामूहिक प्रयत्न अधोरेखित करणाऱ्या अनेक तरुणांना पाहून आनंद झाला. तुम्ही MyGov, NaMo ॲपवरही आपल्या सुचना सामायिक करू शकता किंवा तुमचा संदेश १८००-११-७८०० या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करू शकता. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.