Crime : पाकिस्तानच्या क्रमांकावरून व्यावसायिकाला फोन; मुलाला सोडविण्यासाठी मागितली ४० हजारांची रक्कम

149
Crime : पाकिस्तानच्या क्रमांकावरून व्यावसायिकाला फोन; मुलाला सोडविण्यासाठी मागितली ४० हजारांची रक्कम

मुंबईतील एका व्यावसायिकाला पाकिस्तानच्या मोबाईल क्रमांकावरून आलेल्या एका अनोळखी कॉल वरून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून “तुमच्या मुलाला गॅंगरेपमध्ये ताब्यात घेतले आहे, त्याला सोडविण्यासाठी ४० हजार रुपये ऑनलाइन पाठवून द्या नाहीतर तुमच्या मुलाला गुन्ह्यात अटक करू”, अशी धमकी देण्यात आल्याचा प्रकार व्यावसायिकाने दुसऱ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार असल्याचे व्यावसायिकाने सोशल मीडियावर म्हटले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या व्यावसायिकाच्या जागृतेचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. (Crime)

मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकाऱ्यांचा फोटो असलेल्या व्हॉट्सअॅप वरून एक कॉल आला होता. कॉल करणाऱ्याने आपली ओळख मुंबई पोलीस असल्याची करून देत व्यवसायिक यांचा मुलगा आयुष आणि त्याच्या काही मित्रांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा दावा केला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आयुषची सुटका करण्यासाठी पैशांची मागणी केली, +92 ISD कोडसह मोबाईल नंबरवरून पाकिस्तानमधून कॉल करणाऱ्या कॉलरचे आणि व्यावसायिक यांच्यातील संपूर्ण संभाषण व्यावसायिकाने दुसऱ्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. (Crime)

(हेही वाचा – BMC वर कर्ज घेण्याची येणार वेळ, रवी राजा यांनी अशी का व्यक्त केली भीती)

कॉल मधील संभाषण

“हे बघा साहेब, तुमच्या मुलाने काय केले ते तुम्हाला माहीत नाही. तुमच्या मुलाने आणि त्याच्या तीन मित्रांनी एका मुलीवर बलात्कार केला आहे आणि पीडिता आता रुग्णालयात आहे. हे प्रकरण गंभीर आहे,” असे कॉल करणाऱ्या व्यक्तीकडून सांगण्यात होते. विशेष म्हणजे, कॉल करणाऱ्याने या घटनेचे नाट्यमयीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि ते सत्य असल्याचे भासवण्यासाठी एका मुलाचा रडण्याचा आवाज व्यावसायिकाला काढून दाखवला, हा खोटा कॉल असल्याचे व्यावसायिकाने ओळखले, कॉल करणाऱ्या संभाषणात अडकवून ठेवण्यासाठी व्यावसायिकाने कॉल रेकॉर्ड केला. कॉलरने ४० हजार रुपयांची खंडणी मागितली, ४० हजार बस होतील का? ४ लाख पाठवतो कुठे पाठवायचे, कुठल्या पोलीस ठाण्यात पाठवायचे असे व्यावसायिकाने कॉलरला बोलताच कॉलरने फोन कट केला. इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकाने संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याला प्रतिसाद देत मुंबई पोलिसांनी लोकांना अशा कॉलला प्रतिसाद देऊ नका असे सांगितले आणि व्यावसायिकाच्या जागृतेचे कौतुक केले. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.