वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी Pooja Khedkar वर दिल्ली पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील यूपीएससीने Pooja Khedkar यांना केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे.

248
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी Pooja Khedkar वर दिल्ली पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी Pooja Khedkar वर दिल्ली पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. याआधी यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच युपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. तुमची उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा देखील यूपीएससीने पूजा खेडकर यांना केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे.

(हेही वाचा – विरोधकांच्या खोट्या प्रचाराला BJP देणार सडेतोड जवाब; 20 नेत्यांची तगडी टीम तयार)

काय आहेत पूजा खेडकरचे कारनामे ?
  • पूजा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रे निर्माण करून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली, जे नियमांच्या विरोधात आहे.
  • आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे.
  • कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही पूजा खेडकर यांनी काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीचा आरोप पूजा खेडकरांनी केला आहे. या आरोपांसदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे.
कुटुंबीयही अडकले वादात

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले असाता मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.